Home /News /national /

भाजपा सरकारमधील पहिले लष्करी सेवा देणारे मंत्री; लेफ्टनंट पदावर नियुक्ती, पाहा VIDEO

भाजपा सरकारमधील पहिले लष्करी सेवा देणारे मंत्री; लेफ्टनंट पदावर नियुक्ती, पाहा VIDEO

Anurag Thakur Territorial Army: 2016 पासून टेरिटोरियल आर्मी (Territorial Army) म्हणून सेवा बजावणाऱ्या अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना नियमित कमिशनर अधिकारी म्हणून कॅप्टन पदावर पदोन्नती (promoted to rank of Captain) देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 मार्च: भाजपाचे नेते (BJP Leader) आणि केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री (Minister of State for Finance and Corporate Affairs) अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना नुकतीच भारतीय लष्करामध्ये पदोन्नती मिळाली आहे. 2016 पासून टेरिटोरियल आर्मी (Territorial Army) म्हणून सेवा बजावणाऱ्या अनुराग ठाकूर यांना नियमित कमिशनर अधिकारी म्हणून कॅप्टन पदावर पदोन्नती (promoted to rank of Captain) देण्यात आली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यावेळी त्यांनी पदोन्नती समारंभाचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे अनुराग ठाकूर हे विद्यमान भाजपा सरकारमधील पहिले लष्करी सेवा देणारे खासदार आणि मंत्री आहेत. जुलै 2016 मध्ये अनुराग ठाकूर यांना लेफ्टनंट पदाच्या रुपात प्रादेशिक लष्करामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. याबाबतची माहिती खुद्द अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, "मला जुलै 2016 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये नियमित अधिकारी म्हणून लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आज मला ही माहिती देताना अत्यंत आनंद होतं आहे की, आज मला भारतीय सेनेत कॅप्टन पदावर बढती मिळाली आहे. मी नेहमीच भारत मातेच्या सेवेसाठी वचनबद्ध होतो. त्यामुळे भारतीय लोकांची सेवा करीत राहील. जय हिंद " हे ही वाचा- पेट्रोल, डिझेलवर GST लावण्याची शिफारस तूर्तास नाही; चर्चेसाठी केंद्र सरकार तयार- अनुराग ठाकूर अनुराग ठाकूर यांच्या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही अनुराग ठाकूर यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच भारतीय लष्करातील भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकूर यांनी ट्वीट केलं की, टेरिटोरियल आर्मी समारंभानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी यांनी मला संसदेत आमंत्रित केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या