Home /News /national /

रेल्वे स्टेशन, चहा आणि अमित शाह! राजकीय वर्तुळात पुन्हा ‘चाय पे चर्चा’ सुरू, पाहा VIDEO

रेल्वे स्टेशन, चहा आणि अमित शाह! राजकीय वर्तुळात पुन्हा ‘चाय पे चर्चा’ सुरू, पाहा VIDEO

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी एका (Union Minister Amit Shah inaugurates tea stall) चहाच्या दुकानाचं उद्घाटन करून तिथं गरमागरम चहाचे घुटके घेतल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

    गांधीनगर, 8 ऑक्टोबर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी एका (Union Minister Amit Shah inaugurates tea stall) चहाच्या दुकानाचं उद्घाटन करून तिथं गरमागरम चहाचे घुटके घेतल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अमित शाह यांच्यासोबत (Amit Shah and Gujrat CM Bhupendra Patel) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलदेखील यावेळी उपस्थित होते. स्वतः अमित शाह यांनी आपल्या चहाच्या दुकानाचं उद्घाटन केल्याचा आनंद हे दुकान चालवणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. भाजप आणि चहाचं समीकरण 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि चहा हे समीकरण समोर आलं होतं. प्रत्येक सर्वसामान्य भारतीयांचं आवडतं पेय असणाऱ्या चहाशी आपलं नातं जोडत भाजपनं मतदारांच्या मनात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना चांगलंच यश आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बालपणी चहा विकत असल्याच्या घटनेचा प्रचारात जोरदार वापर करून घेण्यात आला होता. त्यामुळे मोदी आणि चहा हे जणू समीकरणच बनलं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आणलेली ‘चाय पे चर्चा’ ही संकल्पनाही भाजपच्या पथ्यावर पडली होती. आता अमित शाहांनी चहाच्या दुकानाचं उद्घाटन केल्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि चहा या समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. हे वाचा - Corona Updates : एकही डोस न घेतलेले कर्मचारी ठरणार ‘गैरहजर’, 'या' सरकारचा निर्णय अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेल्या नव्या चहाच्या दुकानाचं उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही हजर होते. गुजरातमध्ये मातीकाम करणाऱ्या महिलांच्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने हे चहाचं दुकान चालवण्यात येत आहे. यामुळे कष्टकरी महिलांना रोजगार मिळणार असून सहकार खात्याने रेल्वे स्थानकांवर या महिलांना व्यवसायासाठी रितसर जागा उपलब्ध करून दिली आहे. अमित शाह रेल्वे स्टेशनवर चहा पितानाच व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Amit Shah, Gujrat, Tea

    पुढील बातम्या