छतरपूर, 23 जानेवारी : 'मुलगी आहे, लढू शकते' असं म्हणत छतरपूरमध्ये एका विद्यार्थिनीने केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांच्यासमोर भिडली. गावातील समस्या घेऊन ही तरुणी गावात आलेल्या मंत्र्याकडे पोहोचली. मंत्र्यांना गावकऱ्यांना होणारा त्रास स्पष्ट शब्दात न घाबरता सांगितला. आणि यावर उपाययोजना करण्याचंही आवाहन केलं. मंत्र्यांनीही मुलीचं बोलणं ऐकून तत्काळ सेक्रेटरी तहसीलदार आणि एसडीएमला बोलावलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पिपट गावातील आहे. 21 वर्षीय या तरुणीचं नाव लक्ष्मीबाई चौरसिया आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि खासदार विरेंद्र कुमार गावात आले होते. यावेळी लक्ष्मीबाईही तेथे पोहोचली. तरुणीचं बोलणं ऐकून मंत्र्यांनी तत्काळी सेक्रेटरी, तहसीलदार, एसडीएम यांना बोलावलं आणि मुलीचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी तरुणी म्हणाली की, या सर्व अधिकाऱ्यांना मी अनेकदा भेटले परंतू त्यांनी काही काम केलं नाही.
हे ही वाचा-केंद्रीय मंत्र्याचा प्रताप, सरकारी अधिकाऱ्यांना खोली बंद करुन खुर्चीनं मारहाण
तरुणीची बंडखोर वृत्ती अनेकांना भावली..
पुढे तरुणी म्हणाली की, गेल्या 15 वर्षांपासून माझे वडील येथे राहत नाही. ते दिल्ली, हरिद्वार येथे मजुरी करतात. माझ्या कुटुंबात माझी आई आणि दोन छोटे भाऊ आहेच. आमचं रेशन कार्ड बंद झालं आहे. मात्र अद्याप आम्हाला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. मी गेल्या दीड वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र कोणीच आम्हाला मदत करीत नाही.
गावातील अनेकांची हिच समस्या आहे. गरीबांचा कोणीच ऐकत नाही का? गावकऱ्यांना अनेक प्रश्नाला समोरं जावं लागत आहे. मात्र त्यांचं ऐकून घेतलं जात नाही. त्यांच्या समस्या कोणी सोडवत नाही. लोक प्रतिनिधींची निवड कशासाठी करून दिली जाते. त्यानी गावकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यायला हवं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.