आज पुन्हा एकदा भारत बंदची हाक, राज्यात सतर्कतेचा इशारा

आज पुन्हा एकदा भारत बंदची हाक, राज्यात सतर्कतेचा इशारा

दलित संघटनांनी अॅट्राॅसिटी कायद्याची बदलाच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदनंतर आता सवर्ण समाजानेही आज भारत बंदचं आवाहन केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : दलित संघटनांनी अॅट्राॅसिटी कायद्याची बदलाच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदनंतर आता सवर्ण समाजानेही आज भारत बंदचं आवाहन केलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना कायदा सुवव्यस्था कायम राखण्यासाठी आदेश जारी केले आहे. संवदेशील ठिकाणी जमावबंदी करण्याचे निर्देशही केंद्राने दिले आहे.

दोन एप्रिलला दलित संघटनांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसकवळण लागले होते. मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता.

दलित संघटनांच्या भारत बंदनंतर आता सवर्ण समाजाने आज भारत बंद पुकारला आहे. सोशल मीडियावर या बंद बदल आवाहन केलं जात आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कडेकोट सुरक्षा ठेवण्याचे आदेश दिले आहे. जर कुठेही हिंसाचार उफाळला तर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त जबाबदार असणार आहे असंही केंद्राने बजावलंय.

 

मध्यप्रदेशमध्ये कडक बंदोबस्त

दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचे सर्वात जास्त पडसाद मध्यप्रदेशमध्ये उमटले.  ग्वालियर, मुरैना आणि भिंड मध्ये हिंसाचारात 8 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता 10 तारखेला पुकारलेल्या भारत बंद विरोधात पोलिसांची कंबर कसली. चार दिवसांनंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

First published: April 9, 2018, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading