नवी दिल्ली 03 डिसेंबर: केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) ने देशातल्या टॉप-10 पोलीस स्टेशन्सची (police stations) यादी जाहीर केली आहे. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत उत्तमपणे काम करणाऱ्या पोलीस स्टेशनची यात निवड करण्यात आली आहे. यावर्षी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्याबाबतची अटही टाकण्यात आली होती. यात अनेक छोट्या राज्यांच्या पोलीस स्टेसनचा समावेश असता तरी टॉप टेपमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही पोलीस स्टेशनचा समावेश नाही.
या यादीमध्ये मणिपूर (Manipur) च्या थौबल इथलं नोंगपोक सेमकई पोलीस स्टेशन पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या आणि तीसऱ्या स्थानावर तमिलनाडू आणि अरुणाचल प्रदेशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची निवड व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अशा प्रकारची निवड करायला सुरूवात केली होती.
केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेली समिती सर्व्हेंक्षण करून पोलीस स्टेशनची निवड करते. अतिशय प्रतिकूल परिस्थित उत्कृष्टपणे काम करणं, गुन्ह्यांची उकल, त्यासाठीचा वेळ, महिलांविरोधातले अत्याचार, त्याविरुद्धची कारवाई, तक्रार सोडविण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता. यावेळी कोरोना प्रोटोकॉलचं कशा पद्धतीने पालन केलं जातं त्याचाही समावेश अटींमध्ये करण्यात आला होता.
ही आहे देशातल्या टॉप-10 पोलीस स्टेशनची यादी