Home /News /national /

बंगालमध्ये अमित शाह म्हणाले, खबरदार! भारतावर हल्ला कराल तर घरात घुसून मारू

बंगालमध्ये अमित शाह म्हणाले, खबरदार! भारतावर हल्ला कराल तर घरात घुसून मारू

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (NSG) नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

    कोलकाता,1 मार्च: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (NSG) नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमित शाह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले, 'आम्हाला जगभरात शांतता अपेक्षित आहे. हल्ला करणारे आपला मृत्यू निश्चित करून येत असतो. आता मात्र भारतावर हल्ला करणाऱ्यांची खैर नाही. भारतही मागे राहणार नाही. शत्रुला घरात घुसून मारू. अमित शाह यांनी यावेळी 'सर्जिकल स्ट्राइक'चं उदाहरण देताना सांगितलं की, 'अमेरिका-इस्रायल ज्याप्रमाणे घरात घुसून मारतात, आता भारताचेही नाव घरात घुसून मारणाऱ्या देशांच्या यादीत आले आहे.' अमित शाह म्हणाले, 'पाच वर्षांत NSG ने भारत सरकारकडून ज्या काही अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या सर्व अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने पूर्ण केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी एक दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमित शाह यांचे स्वागत केले. यादरम्यान, नागरिकत्त्व सुधारित कायद्याच्या (सीएए) विरोध करणाऱ्या वाम मोर्चा आणि काँग्रेसच्या शेकडो आंदोलकांनी विमानतळाबाहेर 'परत जा'च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. अमित शाह यांच्या कोलकाता दौऱ्याचे Updates - अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (NSG) नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. अमित शाह यावेळी म्हणाले, कोणत्याही देशाने घुसखोरी केली आणि आमच्या जवानांना इजा पोहोचवली तर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. - शहीद मीनार मैदानावर दुपारी 2.30 वाजता प्रदेश भाजपच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. - शहीद मीनार येथील जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर सायंकाळी चार वाजता कालीघाट मंदिराला भेट देतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात बंद खोलीत चर्चा करतील. या बैठकाला पक्षाचे सर्व खासदार, आमदारांना बोलवण्यात आलं आहे. यावेळी आगामी महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची रणनीति ठरवण्यात येणार आहे. हेही वाचा... दिल्ली हिंसाचार शांत होताच पुन्हा सापडला मृतदेह, नाल्यातून बाहेर काढलं शव
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: West bengal

    पुढील बातम्या