'मॅच बॅकफूटवर खेळून जिंकली जात नाही', अरूण जेटलींचा सॅम पित्रोदांवर 'एअर स्ट्राईक'

'मॅच बॅकफूटवर खेळून जिंकली जात नाही', अरूण जेटलींचा सॅम पित्रोदांवर 'एअर स्ट्राईक'

सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचा जोरदार हल्लाबोल

  • Share this:

दिल्ली, 22 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सॅम पित्रोदांवर केंद्रीय मंत्री यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही जे केले त्याला पित्रोदा चुकीचं म्हणत आहे. मात्र, जगातील कोणत्याच देशाने बालाकोट हल्ल्याला चुकीचं म्हटलं नाही. फक्त पाकिस्तानने यावर प्रश्न उपस्थित केला होता. आपलं दुर्भाग्य की असे लोक एका पक्षाचे आदर्श आहेत.

अरुण जेटली म्हणाले की, जर गुरू असा असेल तर शिष्य किती बिनकामाचा असेल आणि देशाला काय भोगावे लागत आहे अशा शब्दांत जेटलींनी पित्रोदांसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाना साधला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात पित्रोदा यांनी केलेलं विधान लज्जास्पद असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की,'सॅम पित्रोदा यांनी भारतीय लष्कराचा अपमान केला आहे. 130 कोटी जनता काँग्रेसला माफ करणार नाही. विरोधकांच्या अशा विधानांवर लोकांनी प्रश्न उपस्थित करावेत, असे आवाहन मी जनतेला करतो.''विरोधकांकडून वारंवार आपल्या जवानांचा अपमान केला जात आहे. जनता काँग्रेसला माफ करणार नाही. भारतीय जनता सदैव भारतीय लष्कराच्या पाठीशी आहे', असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या सॅम पित्रोदांचं वादग्रस्त विधान

'मला हल्ल्यांबाबत फारसं काही माहीत नाही. पण, हल्ले होतच असतात. मुंबईवर देखील दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी देखील एअर स्ट्राईक करता आला असता. पण, ते चुकीचं होतं. माझ्या मताप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती', असे वादग्रस्त विधान सॅम पित्रोदांनी केलं आहे.

'काही लोक येतात आणि हल्ला करतात. त्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार कसं ठरवणार?' असा सवालही यावेळी सॅम पित्रोदा यांनी केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले म्हणता. त्याला पुरावा काय?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पित्रोदा यांच्या या विधानावर भाजपनं जोरदार टीका केली आहे.

'मी न्यू यॉर्क टाईम्स आणि इतर काही पेपर वाचले आहेत. त्यामुळं खरंच हल्ला करण्यात आला होता का? असा सवाल देखील निर्माण होतो.' असं देखील पित्रोदा यांनी यावेळी म्हटलं. 'मी सवाल केले म्हणून मला देशविरोधी ठरवता येत नाही. शिवाय, मी या बाजूचा की त्या बाजूचा हे देखील ठरवता येत नाही' असं देखील यावेळी पित्रोदा यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 01:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading