केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अनिल माधव दवे यांचा मध्य प्रदेशच्या उज्जैन इथे 6 जुलै 1956 साली झाला. अनिल दवे हे 2009 पासून राज्यसभेवर खासदार होते.

  • Share this:

18 मे : केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने आज निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.

अनिल माधव दवे यांचा मध्य प्रदेशच्या उज्जैन इथे 6 जुलै 1956 साली झाला. अनिल दवे हे 2009 पासून राज्यसभेवर खासदार होते. त्यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान खात्याचं मंत्रीपद होतं. त्यासोबत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाची बातमी कळताच   ट्विट केलं. 'संध्याकाळपर्यत आम्ही एकत्र होतो, काही योजनांवर आमची चर्चा देखील झाली. त्यांच्या निधनामुळे मोठं नुकसान झालं, अशी भावना मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केलीये.  राजकीय क्षेत्रात त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जातोय.

First published: May 18, 2017, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading