मराठी बातम्या /बातम्या /देश /6 वेळा निवडणूक हरल्यानंतर मिळालं होतं यश; मोदींच्या कॅबिनेटमध्ये हे दलित नेते ठरले 'बाजीगर'

6 वेळा निवडणूक हरल्यानंतर मिळालं होतं यश; मोदींच्या कॅबिनेटमध्ये हे दलित नेते ठरले 'बाजीगर'

'हा' दलित नेता बनला केंद्रात मंत्री बनला आहे. जाणून घ्या कशी आहे त्यांची संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल...

'हा' दलित नेता बनला केंद्रात मंत्री बनला आहे. जाणून घ्या कशी आहे त्यांची संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल...

'हा' दलित नेता बनला केंद्रात मंत्री बनला आहे. जाणून घ्या कशी आहे त्यांची संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल...

  लखनऊ, 7 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार (Cabinet Expansion) आज (7 जुलै) सायंकाळी झाला. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) लखनौमधल्या मोहनलालगंज (Mohanlalganj) लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले कौशल किशोर (Kaushal Kishore) यांचाही त्यात समावेश आहे. ते उत्तर प्रदेशातले दलित नेते असून, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. आता ते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री बनले आहेत. मोहनलालगंज या मतदारसंघातून ते सलग दोनदा निवडून आले आहेत. त्यापूर्वी सहा वेळा त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची चवही चाखावी लागली होती; मात्र ते हिंमत न हरता आपलं काम करत राहिले.

  61 वर्षांचे कौशल किशोर लखनौमधल्या (Lucknow) कोकारी इथले रहिवासी आहेत. 2002मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांनी मलिहाबादच्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली होती. ते पहिल्यांदा आमदार (MLA) झाले ते अपक्ष म्हणून. तेव्हा उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं आणि मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री होते. मुलायमसिंह यांनी त्यांना श्रम राज्यमंत्री केलं होतं; मात्र कौशल किशोर केवळ आठ महिनेच सरकारमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळा ते लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. आता ते केंद्रीय राज्यमंत्री बनले आहेत; मात्र त्यांची इथपर्यंतची वाटचाल बरीच संघर्षाची आहे.

  नव्या ‘टीम मोदी’ची वैशिष्ट्यं, या 7 गोष्टींचं होतंय विशेष कौतुक

  2013मध्ये कौशल किशोर यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी सगळ्या निवडणुका अपक्ष (Independent Candidate) म्हणूनच लढवल्या. राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी नावाचा एक पक्षही त्यांनी स्थापन केला होता. 1989मध्ये त्यांनी लखनऊ जिल्ह्यातल्या मलिहाबाद (Malihabad) या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यात ते हरले. त्या वेळी त्यांना केवळ 1800 मतंच मिळू शकली होती. 1991, 1993 या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकाही ते लढले; मात्र त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये दर वेळी वाढ झाली असली, तरी ते जिंकून येऊ शकले नाहीत. मात्र मतसंख्या वाढत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि ते निवडणुका लढवत राहिले.

  पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता; आता मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ

  2002मध्ये ते पहिल्यांदा मलिहाबादमधून आमदार झाले. मुलायम यांच्या सरकारमध्ये आठ महिन्यांसाठी का होईना, पण मंत्रीही बनले. 2007मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली; पण त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. 2009मध्ये मलिहाबाद पोटनिवडणुकीलाही ते उभे राहिले होते. तेव्हा राज्यात मायावती यांचं सरकार होतं. या पोटनिवडणुकीतही कौशल किशोर हरले. त्यांच्या पराभवाचा हा सिलसिला 2012च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिला. या सगळ्या निवडणुकांमध्ये ते अपक्ष म्हणूनच उभे राहिले होते. 1989पासून 2014पर्यंतच्या कालावधीत केवळ 2002चा अपवाद वगळता सहा विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

  अखेरीस 2013मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014मध्ये त्यांना पक्षाने मोहनलालगंज या सुरक्षित मतदारसंघातून तिकीट दिलं. तेव्हा कौशल किशोर पहिल्यांदा खासदार झाले. 2019मध्येही ते पुन्हा खासदारकीची निवडणूक जिंकले. दरम्यान, 2017मध्ये मलिहाबाद या त्यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी जयदेवी कौशल निवडून आल्या आणि आमदार झाल्या. आता कौशल किशोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनले आहेत.

  सध्या ते भाजपच्या अनुसूचित विभागाचे अध्यक्ष आहेत. कौशल किशोर यांना केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपने दलित मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

  First published:
  top videos