केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : सेनेपाठोपाठ जदयूलाही निरोप नाही

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : सेनेपाठोपाठ जदयूलाही निरोप नाही

एनडीएचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि जदयूला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान आहे की नाही हे माहिती नाही.

  • Share this:

02 सप्टेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे काही तास शिल्लक असताना एनडीएचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि जदयूला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान आहे की नाही हे माहिती नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्याला भाजप किंवा पीएमओकडून असा फोन आला नसल्याचं सांगितलंय.

पहिल्यांदा फोन तर येऊ द्या मग मंत्रिमंडळातील समावेशाचा विचार होईल अशा शब्दात नितीशकुमारांनी आपली अस्वस्थता बोलून दाखवली.

शिवसेना आणि जदयु तसे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यासाठी इच्छूक आहेत. पण उद्या सकाळी विस्तार होणार असताना अजूनही मित्र पक्षांना काय मिळणार किंवा नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे एनडीएच्या घटकपक्षांमध्ये अस्वस्थता वाढलीये.

First published: September 2, 2017, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading