नवी दिल्ली, 07 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या दुसऱ्या कार्य काळाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) आज होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जवळपास 20 ते 25 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तर 8 ते 10 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 6 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे त्या सर्वांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाच्या वतीने दूरध्वनी करण्यात आला आहे. यापैकी अनेक जण मंगळवारी रात्रीच दिल्लीत पोहोचले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जवळपास 20 ते 25 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असून यासाठी सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. यावेळी 12 पेक्षा जास्त मंत्र्यांचा विभाग बदलण्याची शक्यता असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून 8 ते 10 मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता असून जवळपास 6 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी होणार असल्याची सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये 20 पेक्षा जास्त नवीन चेहरे असल्याचे संकेत राजकीय सूत्रांनी दिले असून केंद्रीय मंत्रिमंडळाचा तरुण चेहरा आणि निवडणूक होवू घातलेल्या राज्यांना जादा प्रतिनिधित्वचे सूत्र नरेंद्र मोदी यांनी आखले असल्याची माहिती पुढे आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, आगामी काही काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मनिपुर या राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या राज्यातील लोकप्रतिनिधींना ज्यादा संधी देण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान, सोशल इंजिनीरिंग कडे ठेवण्यात आले लक्ष देण्यात आले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशतील मंत्र्यांच्या कामकाजावर मोदी नाराज असून एक दर्जेन पेक्षा जास्त नेत्यांना पाठविण्यात आले निमंत्रण पाठविण्यात आले आहे.या विस्तार कार्यक्रमाला 100 ते 120 निमंत्रित होणार सहभागी होणार आहेत.राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये होणार शपथविधी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.