मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, ‘इतक्या’ मंत्र्यांचा होणार शपथविधी, महाराष्ट्रातून ‘हे’ दोन चेहरे

मोठी बातमी : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, ‘इतक्या’ मंत्र्यांचा होणार शपथविधी, महाराष्ट्रातून ‘हे’ दोन चेहरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होणार असून जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होणार असून जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होणार असून जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 6 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) बुधवारी (Wednesday, 07 July) संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी (6.30PM) होणार असून जवळपास 20 मंत्री (20 ministers) शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याची यादी आणि इतर तपशील राष्ट्रपती भवनाला पाठवले जातील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 120 मान्यवरांना (120 invitee) आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील दोन नावे

महाराष्ट्रातून भाजपचे नेते विनय सहस्रबुद्धे आणि नारायण राणे या दोन नावांची सध्या दिल्लीत जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे प्रवक्ते असणारे आणि भाजपचा थिंक टँक अशी ओळख असणारे विनय सहस्रबुद्धे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनादेखील दिल्लीवरून फोन आल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

पहिलाच विस्तार

2019 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीनंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचं चित्र आहे. ज्योतिरादित्य सिंदिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सोनोवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ही मंडळी सध्या दिल्लीत दाखल झालेली असून इतरही विविध राज्यातील संभाव्य चेहरे दिल्लीत असल्याचं चित्र आहे.

हे वाचा - मोदींचा असाही मास्टरस्ट्रोक, सेनेला डिवचत अवजड खाते राणेंना मिळणार?

शपथविधीत नेमका कुणाचा सहभाग असेल, याची माहिती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नसली, तरी दिल्लीत दाखल झालेल्या नेत्यांवरून त्याचा अंदाज यायला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे आठ राज्यांच्या राज्यपालांमध्येदेखील बदल होणार असल्यामुळे आणि त्यात काही विद्यमान मंत्र्यांना राज्यपालपदी बढती मिळणार असल्यामुळे त्याचीदेखील जोरदार चर्चा सध्या दिल्लीत रंगली आहे.

First published:
top videos

    Tags: Narendra modi, Union cabinet