नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, या पाच मोठ्या कंपन्या काढणार विक्रीला

नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, या पाच मोठ्या कंपन्या काढणार विक्रीला

लोककल्याणासाठी योजना करणं हे सरकार काम आहे. कंपन्या चालवणं नाही असं सांगत त्यावेळी सरकारने तोट्यात चालणाऱ्या अनेक कंपन्या विक्रीला काढल्या होत्या

  • Share this:

नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : देशात आर्थिक मंदीची चाहुल लागलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतलाय. सरकारी मालकीच्या चार मोठ्या कंपन्या विक्रीला काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी या निर्णयाची माहिती दिली. या चारही कंपन्या देशातल्या मोठ्या कंपन्या आहेत. मात्र त्यांचा वाढता खर्च आणि कमी होत जाणारं उत्पन्न यामुळे तोटा येत असल्याने आर्थिक बोजा कमी करण्यासाठी या कंपन्यांची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.यात बीपीसीएल म्हणजेच Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचबरोबर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) आणि कॉनकोर (CONCOR) या कंपन्यांचाही समावेश आहे. आणखी काही सरकारी मालकीच्या कंपन्यांमधला 51 टक्के हिस्सा विक्रीला काढणार आहे. या कंपन्यांमधल्या शेअर्सचा 50 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा विकण्यात येणार असून त्यामुळे सरकारची मालकी जाणार आहे.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सरकारचं निर्गुंतवणूक धोरण तयार झालं होतं. लोककल्याणासाठी योजना करणं हे सरकार काम आहे. कंपन्या चालवणं नाही असं सांगत त्यावेळी सरकारने तोट्यात चालणाऱ्या अनेक कंपन्या विक्रीला काढल्या होत्या. Air Indiaच्या विक्रीचाही सरकारचा विचार असून त्यासाठीच्या काही प्रयत्नांना यश आलं नव्हतं. आजच्या बैठकीत मात्र त्यावर निर्णय झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 10:23 PM IST

ताज्या बातम्या