केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता

ब्रिटिश परंपरेनुसार देशात आजवर फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, या परंपरेला छेद देऊन जेटली एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2017 11:27 AM IST

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता

04 डिसेंबर: वस्तू व सेवा कर (जीएसटी) योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुढील वर्षी एक फेब्रुवारी रोजी मांडतील, अशी शक्यता आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० जानेवारी रोजी सुरू होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील  अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. आर्थिक पाहणी अहवाल ३१ जानेवारीला सादर होणार असून, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होईल  अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

ब्रिटिश परंपरेनुसार देशात आजवर फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, या परंपरेला छेद देऊन जेटली एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प एक महिना आधी सादर करून त्यातील तरतुदींची अंमलबजावणी एक एप्रिलपासून, म्हणजे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच होऊ शकते. त्याचप्रमाणे रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्याची सुमारे शंभर वर्षांची परंपरा मोडून आता ते अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून एकत्रच सादर केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 11:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...