Home /News /national /

आमचं काही चुकतं का? जेव्हा पंतप्रधान बैठकीत अर्थतज्ज्ञांना विचारतात प्रश्न

आमचं काही चुकतं का? जेव्हा पंतप्रधान बैठकीत अर्थतज्ज्ञांना विचारतात प्रश्न

सरकारचा हा अर्थसंकल्प हा धाडसी आणि मोठे निर्णय घेणारा असेल अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

    नवी दिल्ली 09 जानेवारी : केंद्रीय अर्थसंकल्पाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. अर्थव्यवस्था मंदीदृष्य परिस्थितीतून जातेय. ऑटो आणि इतर अनेक क्षेत्रातला विकासाचा वेग मंदावलाय. GDPमध्येही मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जागतिक मंदीही असल्याने अर्थव्यवस्थेला उभारी द्यायची कशी असा प्रश्न सरकारपुढे आहे. या सगळ्या वातावरणात 1 फेब्रुवारीला मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातला पहिला अर्थसंकल्प येणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदीं गेल्या काही दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. सोमवारी त्यांनी देशातल्या प्रमुख उद्योगपतींशी बैठक घेतली तर आज देशातल्या मुख्य अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली. नीती आयोगाने या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला देशातले अनेक अर्थतज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आर्थिक धोरणं आखताना सरकारचं काही चुकत असेल तर अर्थतज्ज्ञांनी ते लक्षात आणून दिलं पाहिजे. सरकार आवश्यक त्या दुरुस्ती करायला तयार असल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या सूचनांचं अर्थतज्ज्ञांनी स्वागत केलं. यावेळी अर्थतज्ज्ञांनी पंतप्रधानांना अनेक सूचना केल्या. ग्रामीण भागात जास्त पैसे खर्च केले पाहिजे. मात्र इन्कम टॅक्समध्ये जास्त सुट देऊ नये असं मतही काही तज्ज्ञांनी मांडलं. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि पीयुष गोयल सहभागी होते. या आधी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या होता. बँका आणि काही क्षेत्रांना मदतीची पॅकेजेसही दिली होती. सरकारचा हा अर्थसंकल्प हा धाडसी आणि मोठे निर्णय घेणारा असेल अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Narendra modi, Niti Aayog

    पुढील बातम्या