देवा! आता चायनाचा मालही स्वस्तात मिळणार नाही, असा असेल अर्थसंकल्प 2020

देवा! आता चायनाचा मालही स्वस्तात मिळणार नाही, असा असेल अर्थसंकल्प 2020

'मेक इन इंडिया' या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनांची मागणी वाढण्यासाठी केंद्र सरकारकडून हे पाऊल उचललं जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जानेवारी : अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवरील कस्टम ड्युटीमध्ये वाढ करू शकतात. त्यामुळे अशा उत्पादनांची भारतात आयात करणे महागडे होऊ शकते. कस्टम ड्युटी वाढल्याने तब्बल 300 वस्तूंच्या किंमत वाढण्याची शक्यता आहे. 'मेक इन इंडिया' या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनांची मागणी वाढण्यासाठी केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे.

या उत्पादनांच्या किंमती वाढणार

वाणिज्य मंत्रालयाने वस्तूंच्या किंमती वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. यानुसार विविध प्रकारची कागदे, रबर, फुटवेयर, फर्निचर, कोटेड पेपर आणि खेळणी यांसारख्या वस्तू महागण्यची शक्यता आहे.

किती वाढणार कस्टम ड्युटी

अर्थ मंत्रालयाने जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यापैकी रबरवर कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी वाढवून 40 टक्क्यांपर्यंत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. फुटवेयरवर असलेली 25 टक्के कस्टम ड्युटी वाढवून 35 टक्के करण्यात यावा, असा प्रस्ताव आहे. लाकडाच्या फर्निचरवरील आयात शुल्क 20 ते 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय धातू व प्लास्टिकच्या आयातीत खेळण्यांवर 100 टक्के आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या आपल्याकडे चीन व हॉंगकॉंगमधून येणाऱ्या वस्तूंची संख्या वाढली आहे. चिनी माल हा स्वस्त असल्याने ग्राहकांकडून अशा वस्तू खरेदी करण्याचा कल अधिक दिसून येतो. या देशांमधून येणाऱ्या खेळण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली असल्याने त्यावरील कस्टम ड्युटी वाढविण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांना देण्यात आला आहे.

या वस्तूंवर कस्टम ड्युटी नाही

मंत्रालयाने टाकाऊ पेपर आणि पेपर पल्प यावरील आयात शुल्क शून्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या टाकाऊ पेपरवर 10 आणि पेपर पल्पवर 5 टक्के कस्टम ड्युटी आहे.

 

First published: January 18, 2020, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading