Union Budget 2019 : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही

Union Budget 2019 : पाच लाख उत्पन्न असणाऱ्यांना सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 03:18 PM IST

Union Budget 2019 :  टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही

नवी दिल्ली, 05 जुलै : दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असताना करदात्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. Incom Taxमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबतची घोषणा केली. मोदी सरकार Income Tax Slab कमी करून 3 लाखापर्यंत टॅक्स सूट देणार अशी चर्चा रंगली होती. पण, प्रत्यक्षात मात्र 5 लाख रूपयापर्यंत कर सूट देण्यात आली आहे.

पाच वर्षात वाढले करदाते

महत्त्वाची बाब म्हणजे 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात करामध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण, मागील 5 वर्षामध्ये 6.38 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत करात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षामध्ये करामध्ये 78 टक्के वाढ झाली असल्याची माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

विमा क्षेत्रात 100 टक्के FDI

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यावर मोदी सरकार आता भर देताना दिसत आहे. याची प्रचिती अर्थसंकल्पामध्ये दिसत असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. आपल्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी पुढील पाच वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.त्यामुळे मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचं लक्ष आहे.

Loading...

सर्वांना मिळणार हक्काचं घर

सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

VIDEO: तेरे को मार देंगे, मुलीच्या माहेरच्यांनी भररस्त्यात मारहाण करत नेलं पळवून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...