प्रामाणिक करदात्यांना मिळू शकतं हे बक्षीस, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

प्रामाणिक करदात्यांना मिळू शकतं हे बक्षीस, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

नागरिकांनी कर चुकवू नये, वेळोवेळी कर भरावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सरकार विचार करतं आहे. आता याच उद्देशाने करदात्यांसाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करायचं सरकारने ठरवलं आहे. उद्याच्या बजेटमध्ये याबद्दल काही घोषणा होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जुलै : नागरिकांनी कर चुकवू नये, वेळोवेळी कर भरावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सरकार विचार करतं आहे. आता याच उद्देशाने करदात्यांसाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करायचं सरकारने ठरवलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

देशातले जे नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काही बक्षीस मिळू शकतं. यात शहरातल्या 10 मोठ्या करदात्यांचा समावेश करण्यात येईल. सगळ्यात जास्त कर भरणाऱ्या नागरिकांचं नाव रस्त्याला देण्यासारखं काही बक्षीस यात असेल.

करदात्यांना जर व्हीआयपी ट्रीटमेंट दिली तर कर भरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळेल, असा यामागचा उद्देश आहे. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालातही याबद्दलच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सर्व्हेमध्ये काय आहेत सूचना?

प्रामाणिक करदात्यांना एअरपोर्टवर बोर्डिंगच्या वेळी खास सुविधा द्याव्या, अशी सूचना करण्यात आली आहे. इमिग्रेशन काउंटरवर त्यांच्यासाठी वेगळी रांग असावी, असंही या सर्व्हेमध्ये सुचवण्यात आलं आहे. अशा करदात्यांना टोलनाक्यांवरही काही सुविधा दिल्या जाऊ शकतात.

जे लोक सर्वाधिक कर भरतात त्यांचं नाव एखाद्या इमारतीला, रस्त्यालाही दिलं जाऊ शकतं. त्यांचं नाव विद्यापीठाला किंवा एअरपोर्टला दिलं जावं, अशीही एक सूचना आहे.

प्रामाणिक करदात्यांसाठी एक खास क्लब बनवण्यात यावा. या क्लबचं सदस्यत्व करदात्यांना देण्यात यावं. त्यामुळे समाजामध्ये करदात्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि जास्तीत जास्त कर भरण्याचं प्रोत्साहन नागरिकांना मिळेल, असं या समितीचं म्हणणं आहे. आता या समितीच्या शिफारसींनुसार बजेटमध्ये अशी काही घोषणा होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

==============================================================================================

नारायण राणेंनी कोणत्या शब्दात माफी मागितली, पाहा VIDEO

First published: July 4, 2019, 8:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading