Econimic Survey मध्ये दिलाय 'हा' धक्कादायक सल्ला; भारतात निवृत्तीचं वय वाढणार?

एकीकडे जगभरात Retirement Age कमी करण्यात येत आहे. तरुण वयाच्या चाळीशीतच निवृत्त होत आहेत. स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात मात्र वेगळाच सल्ला देण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 08:45 PM IST

Econimic Survey मध्ये दिलाय 'हा' धक्कादायक सल्ला; भारतात निवृत्तीचं वय वाढणार?

मुंबई, 4 जुलै : एकीकडे जगभरात Retirement Age अर्थात निवृत्तीचं वय कमी करण्यात येत आहे. तरुण  वयाच्या चाळीशीतच निवृत्त होत आहेत.  स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात मात्र वेगळाच उल्लेख आला आहे. 2019 च्या Economic Survey मध्ये निवृत्तीचं वय वाढवण्याशिवाय पर्याय नसेल, असं म्हटलं आहे. देशात जन्मदर आणि लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात निवृत्तीचं वय वाढणार आहे. त्याची तयारी म्हणून आत्तापासूनच उपाययोजना करायला हवी. म्हणजे त्या दृष्टीने आतापासूनच कर्मचाऱ्यांना तयार ठेवता येईल, असा उल्लेख सर्वेक्षणात केला आहे. निवृत्तीचं वय वाढून ते 70 पर्यंत होऊ शकतं.

भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. पुढच्या दोन दशकात तो आणखी कमी होणार आहे. 2021 ते -31 या दशकात लोकसंख्या वाढीचा दर 1 टक्क्याहून कमी 2सेल आणि 2031 ते 41 या दशकात तो अर्ध्या टक्क्याखाली जाण्याची शक्यता आहे. जर्मनी आणि फ्रान्ससारख्या राष्ट्रांमध्ये सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे जाणारा हा लोकसंख्या वाढीचा दर आहे. त्यातच भारतीयांचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे. त्यामुळे भविष्यात निवृत्तीचं वय वाढणार यात शंका नाही. त्याची तयारी आतापासूनच करायला हवी, अशी सूचना या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आली आहे.

सेल्फी पाठवून बोलवली टॅक्सी आणि नव्या नवरीने दागिन्यांसह केला पोबारा

हे असलं तरी, पुढच्या काही वर्षांत भारतात नोकरी करण्याच्या वयात असणाऱ्या लोकसंख्येत मोठी वाढ होणार आहे. 2041 पर्यंत लोकसंख्येत सर्वाधिक संख्या वर्किंग पॉप्युलेशनची असणार आहे.  2021 ते 31 दरम्यान कार्यक्षम वयाच्या तरुणांची संख्या 9 कोटी 65 लाखांनी वाढेल आणि पुढच्या दशकात ती आणखी 4 कोटी 15 लाखांनी वाढेल. त्यामुळे एवढ्या सगळ्या हातांना काम देणं हे मोठं आव्हान असणार आहे. एकीकडे बेरोजगारी काबूत ठेवून नोकऱ्यांची निर्मिती करावी लागेल तर दुसरीकडे निवृत्तीचं वयही वाढवावं लागेल, अशी सूचना या सर्वेक्षणात करण्यात आली आहे. भारतात निवृत्तीचं वय सध्या 58 किंवा 60 आहे. ते 70 पर्यंत वाढू शकतं. कारण भारतात सरासरी आयुर्मानही वाढत आहे.

पोस्टाच्या 'या' 9 सेव्हिंग स्कीम, यातली गुंतवणूक आहे फायदेशीर

Loading...

2021 ते 2041 दरम्यान शालेय वयाच्या मुलांची संख्या जवळपास 18.4 टक्क्यावर येणार आहे. या सगळ्याचा परिणाम सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेवर पडेल, असा दावा या सर्वेक्षणात केला आहे. नव्या शाळा सुरू करण्याऐवजी आहेत त्या शाळा एकत्र करण्याची वेळ तेव्हा येईल, असंही यात म्हटलं आहे.

LIVE VIDEO एका वाघिणीसाठी दोन वाघांची तुंबळ लढाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...