Union Budget 2019 : बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडली ही पंरपरा

Union Budget 2019 : बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडली ही पंरपरा

Union Budget 2019 Highlights : निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करण्यापूर्वीची पंरपरा मोडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जुलै : दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत. शिवाय, टॅक्समध्ये सुट मिळणार का? यावर देखील चर्चा सुरू आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या यावर्षी अर्थिक बजेट सादर करणार आहेत. दरम्यान त्यांच्या सुटकेसमधून काय निघणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण, निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सुरू असलेली परंपरा तोडली आहे. संसदेमध्ये दाखल होताना अर्थमंत्री सुटकेस घेऊन पोहोचतात. पण, निर्मला सीतारामन मात्र चोपडी (बही खाता ) घेऊन संसदेत दाखल झाल्या. त्यावरून देखील सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे ही चोपडी लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली होती. लाल रंग हा शुभ मानला जातो.

Union Budget 2019 : 34 वर्षानंतर सर्वसामान्यांना द्यावा लागणार हा टॅक्स

करदात्यांना मिळणार मोठं बक्षिस

नागरिकांनी कर चुकवू नये, वेळोवेळी कर भरावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सरकार विचार करतं आहे. आता याच उद्देशाने करदात्यांसाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करायचं सरकारने ठरवलं आहे.

देशातले जे नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काही बक्षीस मिळू शकतं. यात शहरातल्या 10 मोठ्या करदात्यांचा समावेश करण्यात येईल. सगळ्यात जास्त कर भरणाऱ्या नागरिकांचं नाव रस्त्याला देण्यासारखं काही बक्षीस यात असेल.

करदात्यांना जर व्हीआयपी ट्रीटमेंट दिली तर कर भरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळेल, असा यामागचा उद्देश आहे. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालातही याबद्दलच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

First published: July 5, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading