Elec-widget

Union Budget 2019 : नवं घर घेणाऱ्यांना मिळणार साडेतीन लाख रुपयांची सूट

Union Budget 2019 : नवं घर घेणाऱ्यांना मिळणार साडेतीन लाख रुपयांची सूट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता तुमचं घर घेण्याचं स्वप्न आणखी सुकर होऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुमचं घर घेण्याचं स्वप्न आणखी सुकर होऊ शकतं. नवं घर घेणाऱ्यांसाठी साडेतीन लाख रुपयांची सूट सरकारने जाहीर केली आहे.

तुम्ही जर 45 लाख रुपयांपर्यंतचं घर घेतलं असेल तर सरकार तुम्हाला होम लोनमध्ये साडेतीन लाख रुपयांची सूट देईल. याआधी नवं घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारने व्याजामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली होती. आता यामध्ये दीड लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक गुंतवणुकीतून साडेतीन लाख रुपयांची व्याजातली सूट मिळवू शकता. सरकारची ही योजना 31 मार्च 2020 पर्यंत लागू असेल.

अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, नवं घर घेणाऱ्याला 15 वर्षांच्या कर्जाच्या मुदतीमध्ये 7 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो.

भाड्याने घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर

भाड्याने घर घेणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांनी चांगली बातमी दिली आहे. घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये सुरळीत आर्थिक व्यवहार व्हावेत यासाठी एक नवा कायदा आणला जाणार आहे.

Loading...

या कायद्यामुळे घरमालक घराचं मनमानी भाडं आकारू शकणार नाहीत. भाड्याने घर घेणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. यावरही या कायद्याद्वारे उपाय काढण्यात येणार आहे. यामुळे भाड्याने घर घेणाऱ्या व्यक्ती आपल्या अडचणींविरोधात दाद मागू शकतात.

Budget 2019 Highlights: हे आहेत बजेटमधले 15 ठळक मुद्दे

दरम्यान, सरकारी जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याची घोषणा केल्यानंतर भाड्यानं राहणाऱ्यांवर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय, या घरांमध्ये गॅस, विज आणि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली.

============================================================================================

'तुला कसली भीती नाही का?' नितेश राणेंच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...