Union Budget 2019 : 34 वर्षानंतर सर्वसामान्यांना द्यावा लागणार हा टॅक्स

Union Budget 2019 Highlights : मोदी सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये सामान्यांना 34 वर्षापासून बंद असलेला आणखी एक टॅक्स भरावा लागू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 10:36 AM IST

Union Budget 2019 : 34 वर्षानंतर सर्वसामान्यांना द्यावा लागणार हा टॅक्स

नवी दिल्ली, 05 जुलै : दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत. शिवाय, टॅक्समध्ये सुट मिळणार का? यावर देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लाईव्ह मिंटनं दिलेल्या माहितीनुसार वडिलोपार्जित संपत्तीवर ( inheritance tax ) पुन्हा एकदा कर भरावा लागू शकतो. कारण, 1985पासून हा कर बंद आहे. पण. 2019च्या अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

बजेटआधी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या काय आहे नवा भाव...

कुणाला मिळणार सुट?

दरम्यान, या कराचा मसुदा देखील सरकारनं तयार केला आहे. तर, ज्या लोकांनी शाळा, कॉलेज, विद्यापीठ यासाठी दान केलं आहे त्यांना या करातून काही सुट मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी सरकार हे लोकांच्या भल्यासाठी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे मोदी सरकारला हा निर्णय घेणं अधिक सोप्प होणार आहे.

प्रामाणिक करदात्यांना बक्षीस, बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

Loading...

सरकारपुढं आव्हान

inheritance tax लागू करणं हे सरकार पुढे मोठं आव्हान आहे. GST लागू केल्यानंतर सरकारी तिजोरीमध्ये अपेक्षित अशी भर पडली नाही. त्यामुळे इतर टॅक्सच्या मदतीनं सरकारी तिजोरीमध्ये वाढ करणं सरकारला क्रमप्राप्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती असून देखील अनेकांकडे टॅक्स भरायला देखील पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना ती संपत्ती विकावी देखील लागेल. एका सरकारी अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...