उत्पन्न 11.75 लाख असलं तरी टॅक्स लागणार नाही, त्यासाठी अशी करा गुंतवणूक

तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर 32,500, 7 लाख रुपये असेल तर 52,500 रुपये आणि 8 लाख रुपये असेल तर 72,500 रुपये तर 9 लाख रुपये असेल तर 92,500 एवढा टॅक्स द्यावा लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 07:54 PM IST

उत्पन्न 11.75 लाख असलं तरी टॅक्स लागणार नाही, त्यासाठी अशी करा गुंतवणूक

नवी दिल्ली 5 जुलै :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदी सरकारचा पहिला बजेट शुक्रवारी मांडला. यात सर्वांच लक्ष होतं ते टॅक्सच्या रचनेकडे. मात्र यात फारसे बदल करण्यात आले नाहीत. फक्त श्रीमंतांवर जास्त कर लावण्यात आला. मध्यमवर्गीयांसाठी ठेवलेली 5 लाखांची मर्यादा कायम ठेवण्यात आलीय. 5 लाखांच्यावर उत्पन्न असलं तर मात्र टॅक्स द्यावा लागेल. पण सरकारने गुंतवणुकीवर काही सुट देण्याची घोषणा केलीय. त्यापद्धतीने गुंतवणूक केली तर 11.75 लाखांपर्यंत उत्पन्न असलं तरी टॅक्स द्यावा लागणार नाही.

Union Budget 2019 : पेट्रोल, डिझेल आणि सोनंही झालं महाग

अर्थमंत्र्यांच्या भाषणात सगळ्यांचं लक्षं असतं ते टॅक्सकडे. निर्मला सितारामन यांनी घर आणि गाडी विकत घेतली तर सुट देण्याची घोषणा केलीय. 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. त्यानंतर 6.75 लाखांपर्यंत टॅक्स वाचवता येऊ शकतो. सेक्शन 80C नुसार 1 लाख 50 हजार गुंतवणूक करावी लागेल. तर सेक्शन 80Dनुसार 25 हजार, तर हाऊसिंग लोन वर 2 लाखापर्यंत सुट मिळू शकते. इलेक्ट्रीक वाहन घेतल्यास 1 लाख 50 हजारांची सुट मिळू शकते. अशा प्रकारे तुमचं 11.75 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकतं.

5 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. मात्र तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर 32,500, 7 लाख रुपये असेल तर 52,500 रुपये आणि 8 लाख रुपये असेल तर 72,500 रुपये तर 9 लाख रुपये असेल तर 92,500 एवढा टॅक्स द्यावा लागणार आहे.

Union Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर

Loading...

इलेक्ट्रॉनिक कार घ्या आणि सुट मिळवा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं पहिलं आर्थिक बजेट सादर केलं. यावेळी अर्थ संकल्पामध्ये काम मिळणार? काय स्वस्त होणार? काय महाग होणार? याकडे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी इलेक्ट्रिक कारवर 5 टक्के GST लावण्याची घोषणा केली आहे. तर, इलेक्ट्रिक कार लोनवर सरकार 1.5 लाखाची सुट देणार आहे. इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी 12 टक्क्यावरून 5 टक्के करण्याची मागणी करण्यात येत होती. इलेक्ट्रिक कारला चालना देण्यासाठी सरकार सर्व कमर्शियल कार या 2026 पर्यंत इलेक्ट्रिक करण्याचा विचार करत आहे. तर, इलेक्ट्रिक कारसाठी दिल्ली – जयपूर हायवेवर काही चार्जिंग स्टेशन्श देखील तयार करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक कार घ्या कर्जात सुट मिळवा अशी घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...