Budget 2019: अर्थसंकल्पाचा तुमच्या घरखर्चावरही होणार परिणाम; कोणत्या गोष्टी महागल्या, कोणत्या झाल्या स्वस्त?

Budget 2019: अर्थसंकल्पाचा तुमच्या घरखर्चावरही होणार परिणाम; कोणत्या गोष्टी महागल्या, कोणत्या झाल्या स्वस्त?

या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काही बाबतीत दिलासा मिळाला आहे, तर काही गोष्टी महागल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काही बाबतीत दिलासा मिळाला आहे तर काही गोष्टी महागल्या आहेत.

केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर आता Petrol, Diesel आणि सोनं महाग होणार आहे. तर 45 इलेक्ट्रॉनिक कार, लाखांपर्यंतचं घर अशा काही वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

या गोष्टींचे दर वाढणार

तंबाखू

सोनं

चांदी

डिझेल

पेट्रोल

काजू

एसी

ऑटोपार्ट

परदेशी पुस्तकं

डिजीटल कॅमेरा

बांधकामाच्या टाईल्स

कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त?

साबण

शॅम्पू

केसांचं तेल

टूथपेस्ट

डिटर्जंट

विजेची घरगुती उपकरणं

प्रवासी बॅगा

बाटल्या, कंटेनर

स्वयंपाकाची भांडी

उदबत्ती

पंखा

चष्म्याच्या फ्रेम्स

सॅनिटरी नॅपकीन

लोकर

सुकं खोबरं

परदेशी संरक्षण उपकरणं

45 लाखांपर्यंतचं घर

इलेक्ट्रॉनिक कार

Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही

Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता. होय, आता PAN Card नसल्यास Income Tax भरणं शक्य होणार आहे. Income Tax भरण्यासाठी आता PAN Card ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्याचे देखील आभार मानले.

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

First published: July 5, 2019, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading