मुंबई, 5 जुलै : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं बजेट आज सादर झालं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमुळे 'आम आदमी' ला चांगले फायदे होणार आहेत.
1. सोनं, पेट्रोल, डिझेल, तंबाखू महाग : सोन्यावरचं शुल्क वाढवून 10 टक्क्यांवरून 12. 5 टक्क्यांवर गेलं आहे. तंबाखूवर अतिरिक्त शुल्क लावण्यात आलं आहे. पेट्रोल - डिझेलवर 1 रुपयांचा अतिरिक्त सेस लावल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागलं आहे.
2. सामान्य माणसांसाठी घरं : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात दीड कोटी घरं बनवण्यात येतील. पुढच्या दोन वर्षात 1 कोटी 95 लाख घरं बनवणार
3. आधार कार्ड आणि पॅन कार्ड : इनकम टॅक्स रिटर्नसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता आधार कार्डवरही तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरू शकता. त्यासाठी पॅन कार्डची गरज नाही.
4. महिलांसाठी घोषणा महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारने नवी घोषणा केली आहे. जनधन खातेधारक महिलांसाठी 5 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाणार आहे. महिलांसाठी विशेष एक लाख रुपयांच्या मुद्रा लोनची व्यवस्था केली जाईल.
5. छोट्या दुकानदारांना पेन्शन : छोट्या दुकानदारांसाठी पेन्शन दिली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. दुकानदारांना कमीत कमी वेळात म्हणजे एका तासात कर्ज देण्याचीही योजना आहे. याचा लाभ 3 कोटींपेक्षा जास्त छोट्या दुकानदारांना मिळेल.
6. नवी नाणी येणार : सरकार एक रुपया ते 20 रुपयांपर्यंतची नवी नाणी आणणार आहे.
7. जास्त पैसे काढायचे असतील तर टॅक्स : जर कुणाला बँकेतून एका वर्षात एक कोटीपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यावर 2 टक्क्यांचा TDS लागणार आहे. म्हणजे एका वर्षात एक कोटी रुपये काढायचे असतील तर 2 लाख रुपये टॅक्समध्येच कट होतील.
8.ग्रामीण भारतावर भर : सरकारने ग्रामीण भाग, शेतकरी आणि गरिबांच्या कल्याणाचा विचार करून हे बजेट सादर केलं आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. उज्ज्वला योजना आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून देशात चांगला बदल झाल्याचा सरकारचा दावा आहे.
9. नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड : सरकारने नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्डची घोषणा केली आहे. याचा वापर रेल्वे आणि बसमध्य करता येईल. रूपे कार्डच्या मदतीने हे कार्ड वापरता येणार आहे. बसचं तिकीट, पार्किंगचा खर्च, रेल्वे तिकीट हे सगळं एकत्र करता येईल.
10. FDI बद्दल मोठी घोषणा : प्रसारमाध्यमांमध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा सरकार विचार करतं आहे. प्रसारमाध्यमांसोबतच विमान उड्डाण आणि अॅनिमेशन क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीबद्दलही विचार केला जाईल. याशिवाय विमा क्षेत्रात 100 टक्के FDI चा विचार होतो आहे.
11. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म हे आमचं उद्दिष्ट आहे, असं सांगितलं. जलमार्गाच्या वाहतुकीवर भर देण्याचाही सरकारचा मोठा विचार आहे. वन नेशन, वन ग्रिड यावरही सरकारचा भर आहे. यासाठीची ब्लू प्रिंट तयार केली जात आहे.
12. शेती आणि व्यापाराच्या क्षेत्रातही सरकार क्रांती आणणार : 'स्फूर्ती' योजनेच्या माध्यमातून देशात 100 नवे क्लस्टर बनवले जाणार आहेत. यामध्ये 20 बिझनेस इन्क्युबेटर करण्यात येतील. यामुळे 20 हजार लोकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येईल.
13. पायाभूत संरचनेवर भर : एक लाख किमीपर्यंतचे रस्ते आणखी चांगले करणार. सरकारने पाणी व्यवस्थापनासाठी जलशक्ती मंत्रालय करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी1500 ब्लॉक ठरवण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवलं जाईल. 2024 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे.
14. स्वच्छतेवर भर : 2014 नंतर 9 कोटी 6 लाख शौचालयं बनवली आहेत. देशभरातली 5 लाख 6 हजार गावं शौचालयमुक्त झाली आहेत.
शिक्षणाबद्दल घोषणा : सरकार नवं शिक्षण धोरण आणणार आहेत. शिक्षण धोरणावर संशोधन केंद्र बनवणार आहेत. सरकार उच्चशिक्षणासाठी 400 कोटी रुपये खर्च करणार आहे. जगभरातल्या टॉप कॉलेजेसमध्ये भारतातली फक्त 3 कॉलेज आहेत. सरकारला आता ही टॉप कॉलेजची संख्या वाढवायची आहे.
15. NRI साठी घोषणा : अनिवासी भारतीयांसाठी सरकारने काही घोषणा केल्या आहेत. NRI भारतात आल्यावर लगेचच त्यांना आधार कार्डची सुविधा दिली जाईल. त्यांना त्यासाठी 180 दिवस भारतात राहण्याची गरज नाही. 17 पर्यटन स्थळं जागतिक दर्जाची करण्यात येतील.
======================================================================================================
Union Budget 2019: बजेट सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया