S M L

625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...!

कर्नाटकचा मोहम्मद कॅफ मुल्ला या विद्यार्थ्याला दहावीच्या परिक्षेत 625 पैकी 624 गुण मिळाले होते. अर्थात तो सगळ्यांमध्ये टॉपर होता. पण...

Renuka Dhaybar | Updated On: Jun 9, 2018 02:21 PM IST

625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...!

कर्नाटक, 09 जून : कर्नाटकचा मोहम्मद  कॅफ मुल्ला या विद्यार्थ्याला दहावीच्या परिक्षेत 625 पैकी 624 गुण मिळाले होते. अर्थात तो सगळ्यांमध्ये टॉपर होता. पण आपला एक मार्क नेमका कुठे कापला आणि कोणत्या प्रश्नासाठी एक मार्क कमी दिला हे जाणून घेण्यासाठी मोहम्मदने त्याची उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली. त्याला विश्वास होता की त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवेत.

मोहम्मदला विज्ञान हा विषय सोडून इतर सगळ्या विषयांत पैकीच्या पैकी मार्क होते. पण बेलगामच्या सेंट झेवियर्समध्ये शिकणाऱ्या मोहम्मदला आईएएस बनायचं होतं. त्याने अकरावीसाठी सायन्समध्ये अॅडमिशन घेतलं होतं. मोहम्मदचे पालक शिक्षक आहे. त्यामुळे मोहम्मदही खूप हुशार होता.

पेपर लिहल्यानंतर मोहम्मदने दोनदा त्याचा पेपर वाचला होता. माझी सगळी उत्तरं बरोबर आहेत. त्यामुळे मला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवेत असं मोहम्मदचं म्हणणं होतं. खरंतर पेपर पुन्हा तपासायला द्यायचे म्हणजे मार्क कमी होणार असा काहीसा समज असतो पण मोहम्मदच्या आत्मविश्वासाला काही तोड नाही.

कारण, पेपर पुन्हा तपासणीनंतर त्याचे मार्क्स वाढले आणि त्याला दहावीच्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. मोहम्मदच्या या यशामुळे त्याच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2018 02:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close