भारतात सर्वात कमी बेरोजगारी; ILO रिपोर्टचा दावा

भारतात सर्वात कमी बेरोजगारी; ILO रिपोर्टचा दावा

भारतात Unemployment कमी असल्याचा दावा ILOनं केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै : सरकार रोजगार निर्मितीत कमी पडलं. तरूणांची फसवणूक झाली असे एक ना अनेक आरोप सरकारवर केले जात आहेत. तर, बेरोजगारांची वाढती संख्या पाहता सरकारपुढे रोजगाराच्या संख्येत वाढ करणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, ILOनं दिलेल्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात कमी बेरोजगारी असल्याचं म्हटलं आहे. भारतात असलेली बेरोजगारी ही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. भारतात बेरोजगारीचा दर हा 3.5 टक्के, चीनमध्ये बेरोजगारीचा दर 4.7 टक्के आणि संपूर्ण आशिया महाद्विपमध्ये बेरोजगारीचा दर 4.2 टक्के आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ILOनं दिलेला रिपोर्ट चुकीचा होता असा दावा लोकसभेत केला. त्यावेळी ILOच्या रिपोर्टमध्ये भारत सर्वाधिक बेरोजगारांचा देश असल्याचं म्हटलं होतं. भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली असली तरी आम्ही समाधानी नसल्याचं गंगवार यांनी म्हटलं आहे. देशात नोकऱ्या आहेत पण, लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या असं संतोष गंगवार यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंची दादागिरी; अभियंत्याला शिवीगाळ, अंगावर ओतलं चिखलाचं पाणी!

रोजगार निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील

असंघटीत क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढावी म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचं संतोष गंगवार यांनी सांगितलं. तर संघटीत क्षेत्रात दरवर्षी 1 कोटी रोजगार निर्मितीचं लक्ष्य असल्याचं देखील संतोष गंगवार यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागांवर भरती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटलं आहे. शिवाय, मागील 5 वर्षामध्ये UPSE आणि SSE अंतर्गत 2,45,470 जागा भरल्याची माहिती देखील यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. सध्या देशात बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.

36 सेकंदात 5 मजली इमारत जमीनदोस्त, पाहा थरारक VIDEO

First published: July 4, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या