मोदी सरकारचे हे मंत्री बेरोजगारीवर काढणार उपाय

मोदी सरकारचे हे मंत्री बेरोजगारीवर काढणार उपाय

भारतामध्ये बेरोजगारीचा दर वाढल्यामुळे मोदी सरकारसमोर रोजगार निर्मितीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळेच आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती याला सरकार प्राधान्य देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंतवणूक आणि आर्थिक वाढीवर भर देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जून : भारतामध्ये बेरोजगारीचा दर वाढल्यामुळे मोदी सरकारसमोर रोजगार निर्मितीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळेच आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती याला सरकार प्राधान्य देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंतवणूक आणि आर्थिक वाढीवर भर देण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे.

रोजगार आणि कौशल्य विकासावर भर

त्याचबरोबर रोजगार आणि कौशल्य विकासावर लक्ष देण्यासाठी 10 जणांची समिती बनवण्यात आली आहे. यामध्ये अमित शहा, पियुष गोयल, निर्मला सीतारामन यांच्यासोबतच कृषी आणि ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे, राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार आणि हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे.

गंगवार आणि पुरी यांच्याकडे कामगार कल्याण आणि रोजगार त्याचबरोबर नागरी सुविधा मंत्रालय आहे.

आर्थिक वाढीचा दर खालावला

भारताच्या आर्थिक वाढीचा दर खालावला असून तो 5. 8 टक्क्यांवर आला आहे. गेल्या काही वर्षांतला हा सगळ्यात कमी दर आहे आणि तो चीनच्याही खाली आहे.

औद्योगिक उत्पादनात वाढ आणि रोजगार निर्मिती यावर या समितीतले सदस्य भर देणार आहेत. यावर काय उपाययोजना केल्या जातील याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात घोषणा करतील.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मंत्र्यांच्या सहा समित्या नेमल्या होत्या.

==================================================================================

VIDEO: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात? काय म्हणाले अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या