10 लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, मोदी सरकारकडे मागितली मदत

10 लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, मोदी सरकारकडे मागितली मदत

या लोकसभा निवडणुकीत देशात रोजगार कमी झाल्याचा मुद्दा गाजला होता. बेरोजगारीची ही टांगती तलवार अजूनही कायम आहे. कार उद्योगामध्ये सलग काही वर्षं मंदी असल्यामुळे 10 लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. कार उत्पादकांच्या संघटनेने याबद्दल मोदी सरकारकडे मदत मागितली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जुलै : या लोकसभा निवडणुकीत देशात रोजगार कमी झाल्याचा मुद्दा गाजला होता. बेरोजगारीची ही टांगती तलवार अजूनही कायम आहे. कार उद्योगामध्ये सलग काही वर्षं मंदी असल्यामुळे 10 लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. कार उत्पादकांच्या संघटनेने याबद्दल मोदी सरकारकडे मदत मागितली आहे.

कारउद्योगासाठी सगळ्यांनाच सारखा जीएसटी म्हणजे 18 टक्के करावा, अशी मागणी या संघटनेने केली आहे. कार उद्योगामुळे सुमारे 50 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. यातल्या 10 लाख नोकऱ्यांवर मात्र गदा येण्याची शक्यता आहे.

'एक्मा' या संघटनेचे अध्यक्ष राम व्यंकटरामाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार उद्योगात अभूतपूर्व मंदी आली आहे. कारच्या उत्पादनात सध्याच्या स्थितीत 15 ते 20 टक्के कपात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

काही ठिकाणी नोकऱ्यांमध्ये कपातही सुरू झाली आहे, असं राम व्यंकटरामाणी यांनी सांगितलं. सध्या 70 टक्के कारच्या भागांवर 18 टक्के GST लावला जातो. तर बाकीच्या 30 टक्के भागांवर 28 टक्के GST आहे. त्याचबरोबर काही वाहनांवर सेसही भरावा लागतो. हा कर एकसारखा केला तर कारउद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळेल,असंही त्यांचं म्हणणं आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन

भारत सरकारने आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे वाहन उद्योगाचं भवितव्य अधांतरी आहे. सरकारच्या या धोरणामुळे देशाचं आयात बिल वाढेल. त्याचबरोबर सध्या देशात असलेल्या कार उद्योगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असंही त्यांनी सांगितलं.

कार उद्योगातल्या नोकऱ्या वाचवायच्या असतील तर आता सरकारनेच कर कमी करून या उद्योगाला मदत करावी, अशी अपेक्षाही कार उत्पादकांच्या संघटननेने व्यक्त केली आहे.

==============================================================================================

VIDEO : चंद्रकांत पाटलांमुळे भाजपचं पितळ उघडं, पाहा काय म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या