Home /News /national /

या अंडरवॉटर मेट्रोमध्ये करा अनोखी सफर, भारतातल्या पहिल्यावहिल्या प्रकल्पाचं आज होतंय उद्घाटन

या अंडरवॉटर मेट्रोमध्ये करा अनोखी सफर, भारतातल्या पहिल्यावहिल्या प्रकल्पाचं आज होतंय उद्घाटन

मुंबईची मेट्रो काही दिवसांतच आपल्या दिमतीला येणार आहे. ही मेट्रो काही ठिकाणी अंडरग्राउंड आहे म्हणजे ती जमिनीखालून जाते. पण कोलकात्यामध्ये अंडरवॉटर मेट्रो तयार झालीय.

    कोलकाता, 13 फेब्रुवारी : मुंबईची मेट्रो काही दिवसांतच आपल्या दिमतीला येणार आहे. ही मेट्रो काही ठिकाणी अंडरग्राउंड आहे म्हणजे ती जमिनीखालून जाते. पण कोलकात्यामध्ये अंडरवॉटर मेट्रो तयार झालीय. यामुळे पाण्याखालून प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (KMRC)इस्ट- वेस्ट प्रकल्पामध्ये मेट्रोचा बोगदा बनवला आहे. हुगळी नदीतून जाणारा हा बोगदा कोलकाता आणि हावडाला जोडेल. 2 टप्प्यात सुरू होतं काम कोलकात्याच्या मेट्रोचं हे काम 2 टप्प्यांत केलं जात होतं. इस्ट - वेस्ट प्रकल्प सुमारे 16 किलोमीटर लांब आहे. हा टप्पा सॉल्ट लेक स्टेडियम ते हावडा मैदानापर्यंत आहे. (हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं) कसा केला अंडरवॉटर बोगदा? या मेट्रोसाठी नदीतून वाट काढत बोगदा बनवणं हे मोठं आव्हान होतं. यासाठी रशिया आणि थायलंडच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून बोगद्यातलं पाणी बाहेर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 3 स्तरांचं सुरक्षा कवच बनवण्यात आलं आहे. या बोगद्यातून 80 किमी प्रतितास वेगाने मेट्रो धावू शकेल. (हेही वाचा : 16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण) अत्याधुनिक मेट्रोचं तिकीट स्वस्त कोलकात्याच्या मेट्रोचं काम 2009 पासून सुरू आहे. या मेट्रोचे सगळे टप्पे 2021 पर्यंत पूर्ण होतील, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ट्रामच्या या शहरात अत्याधुनिक मेट्रोसाठी भाडं मात्र खूपच कमी आहे. एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला जाण्यासाठी 5 रुपये द्यावे लागतील. 5 किलोमीटरसाठी 10 रुपये, 10 किलोमीटरसाठी 20 रुपये आणि शेवटच्या स्टेशनसाठी 30 रुपये लागतील. ====================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Kolkata, Metro

    पुढील बातम्या