CAA अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी द्यावा लागेल धर्माचा पुरावा

CAA अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी द्यावा लागेल धर्माचा पुरावा

CAA कायद्याअंतर्गत नियमावलीचे काम शेवटच्या टप्प्यावर आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (CAA) देशभरात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कायद्याअंतर्गत नियमावलीचे काम शेवटच्या टप्प्यावर आले आहे. सूत्रांनी CAA च्या नियमांची News18 ला  माहिती दिली आहे. त्यानुसार या कायद्याअंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तानातून छळवणूक झाल्याने भारतात आलेल्या व्यक्तींना नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्या धार्मिकतेचा पुरावा द्यावा लागेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार CAA अंतर्गत नागरिकत्व संदर्भात आसाम सरकारच्या स्वतंत्र खिडकीच्या मागणीचा स्वीकार करू शकते. राज्याने गृहमंत्रालयाकडे विनंती केली आहे की ही खिडकी काही काळासाठी खुली असावी. यासाठी लागणारा कालावधी तीन महिन्यांचा असू शकतो. त्यामुळे अवैध अप्रवासी नागरिकत्वासाठी येथे अप्लाय करू शकतील.

भारत आणि परदेशात राहणाऱ्या नागरिकांनी सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा भेदभावपूर्ण असल्याचे सांगत विरोध दर्शविला आहे.

केंद्राने देशभरात CAA लागू केल्यापासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी CAA विरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र भारताने युरोपातील संसदेवरील चर्चेवर नाराजी व्यक्त केली होती. युरोपातील संसद (European Parliament) भारताच्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (Citizenship Act) त्यांच्या काही सदस्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करणार आहेत. युरोपातील संसदेत या आठवड्याच्या सुरुवातीला युरोपियन युनायटेड लेफ्ट (European United Left) नॉर्डिक ग्रीन लेफ्ट (Nordic Green Left) यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार CAA वर चर्चा होणार असून याच्या एक दिवसानंतर मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र भारताने युरोपातील या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे. CAA हा पूर्णत: भारताची अंतर्गत बाब आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CAA संदर्भात प्रस्ताव व पूर्ण आकलन करुन घेण्यासाठी युरोपातील संघ भारताशी संवाद साधतील, असा भारताचा विश्वास आहे.

अन्य बातम्या

विवाहित प्रेयसीला जिवंत जाळलं, तिचा 5 वर्षांचा मुलगाही आगीच्या ज्वालात होरपळला

‘देश के गद्दारों को गोली मारो’ भाजप मंत्र्याला ही घोषणा पडली महागात

First published: January 28, 2020, 12:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading