Home /News /national /

खांद्यावर हात टाकून चालले होते 2 मित्र, अंगावर पिलरचा भाग कोसळला अन्... पाहा VIDEO

खांद्यावर हात टाकून चालले होते 2 मित्र, अंगावर पिलरचा भाग कोसळला अन्... पाहा VIDEO

निर्माणाधीन इमारतीच्या पिलरचा भाग तरुणाच्या डोक्यावर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या तरुणाला मोठा मार लागला आणि तो पिलरच्या मलब्याखाली गेला.

    भरतपूर, 17 डिसेंबर : कितीही नाकारलं तरी मृत्यू आणि काळ कधी आणि कुठे गाठेल सांगता येत नाही. तरुण रस्त्यानं जात असताना त्यांच्यावर पिलरचा भाग कोसळला. एक तरुण एका सेंकदाच्या फरकानं वाचला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला तर या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निर्माणाधीन इमारतीच्या पिलरचा भाग तरुणाच्या डोक्यावर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या तरुणाला मोठा मार लागला आणि तो पिलरच्या मलब्याखाली गेला. आजूबाजूच्या लोकांना त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. तर दुसरा तरुण काही सेंकदासाठी वाचला आहे. त्याच्या अंगावर पिलरचा भाग कोसळला नाही. या घटनेमुळे बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली. हा घटनेचा थरारक VIDEO समोर आला आहे. हे वाचा-Instagram ऑर्डर करताना सावधान! चॅटद्वारे तरूणीला 7 लाखांचा गंडा हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूर इथल्या बाजारपेठेत घडला आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसाप दुकानाचे बांधकाम सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला, तिसऱ्या मजल्यावरील पिलरचा भाग कोसळल्यानं ही घटना घडली. या घटनेमध्ये पिलरचा भाग अंगावर कोसळलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या