धारवाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 80 अडकल्याची शक्यता

कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील कुमारेश्वर नगर येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ठिगाऱ्याखाली 80 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 06:33 PM IST

धारवाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 80 अडकल्याची शक्यता

धारवाड, 19 मार्च: कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील कुमारेश्वर नगर येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ठिगाऱ्याखाली 80 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

कुमारेश्वर नगर येथील निर्माणाधीन असलेली ५ मजली इमारत जमीनदोस्त झाली. सदोष बांधकामामुळे ही इमारत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्था ANI दिलेल्या वृत्तानुसार या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहेत.

बांधकाम सुरु असलेल्या या इमारतीचे पहिले दोन मजले बांधून झाले होते. या इमारतीमधील दोन फ्लॅटची विक्री देखील झाली होती. घटना घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या गाड्यांवर देखील काही भाग कोसळला आहे.Loading...


VIDEO : अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...