वधूला उचलले तर मामाची नियत बिघडू शकते,दारुल उलूमचा फतवा

वधूला उचलले तर मामाची नियत बिघडू शकते,दारुल उलूमचा फतवा

याशिवाय दारुल उलूमने लग्नात दागिन्यावर कोणत्या प्रकाराचे फोटो असतील तर असे घालू नये असाही फतवा काढलाय

  • Share this:

11 नोव्हेंबर : दारुल उलूम देवबंदने पुन्हा एकदा एक फतवा काढला आहे. दारुल उलूमने या फताव्यात मामाकडून वधू उचलून गाडी किंवा मंडपात आणण्यावर आक्षेप घेतला आहे. ही प्रथा इस्लाम विरोधात आहे असा दावा दारुल उलूमने केला आहे.

लग्न सोहळ्यात वधूला उचलून आणण्यात दोघांच्या मनात कामवासना येऊ शकते असं दारुल उलूमचं म्हणणं आहे. त्यामुळे वधूने लग्नातून निरोप घेते वेळी पायी चालत जावं  आणि यावेळी तिची आईसोबत असावी असं दारुल उलूमने म्हटलंय.

हा फतवा काढत असताना दारुल उलूमने स्पष्ट केलंय की, "एक महिला आणि तिचा मामा यांचं पवित्र नातं आहे. कोणताही व्यक्ती आपल्या भाचीला उचलून घेऊ शकत नाही. हे मुस्लिम कायद्यानुसार चुकीचं आहे. जर अशी प्रथा सुरू राहिली तर दोघांपैकी कुणा एकाच्या मनात काम-वासना निर्माण होऊ शकते, त्यामुळे हे नातं खराब होऊ शकतं."

दारुल उलूमने आणखी एक फतवा काढला आहे. मुस्लिम समाजात लग्नाची तारीख काढण्यासाठी 'लाल खत' पाठवण्याच्या प्रथा गैर आहे. ही प्रथा मुस्लिमांकडून आली आहे ती चुकीची आणि यात सहभागी होणेही चुकीचे आहे.

दारुल उलूमचं म्हणणंय की, 'लाल खत' ऐवजी साधारण चिठ्ठी पाठवावी किंवा फोनवर बोलून तारीख ठरवावी असा सल्ला दारुल उलूमने दिलाय.

याशिवाय दारुल उलूमने लग्नात दागिन्यावर कोणत्या प्रकाराचे फोटो असतील तर असे घालू नये असाही फतवा काढलाय. दारूल उलूमच्या या फतव्याचा काही मौलवींनी स्वागत केलं आहे.

==================

First published: November 11, 2018, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading