नराधम काकानं तोडले पुतणीच्या अब्रूचे लचके! पीडिता अंघोळ करत असतानाच घुसला होता घरात

नराधम काकानं तोडले पुतणीच्या अब्रूचे लचके! पीडिता अंघोळ करत असतानाच घुसला होता घरात

पीडिता बाथरुममध्ये अंघोळ करत असताना आरोपी घरात घुसला. घरात कोणी नाही याचा फायदा घेत तो बाथरुमपर्यंत पोहोचला.

  • Share this:

भोपाळ, 5 जुलै: 15 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्काराच्या घटनेने मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहर हादरलं आहे. रातीबड परिसरात एका ओळखीतील व्यक्तीनं घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी ओळखीतला असून पीडित मुलगी त्याला काका असं संबोधत होती.

हेही वाचा...एकतर्फी प्रेमातून नववधूची दिवसाढवळ्या हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

पीडिता बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाच नराधम घरात घुसला होता. बहिणीची आरोळी हाक ऐकून पीडितेचा भाऊ मदतीसाठी धावून आला. तितक्यात आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकरणी रातीबड पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रातीबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी आई-वडील आणि दोन भावासोबत राहते. तिने पोलिसांना दिलेला जबाबात सांगितलं की, शनिवारी दुपारी 11 वाजता ती घरात एकटी होती. आई-वडील आणि भाऊ बाहेर गेले होते. पीडिता बाथरुममध्ये अंघोळ करत असताना आरोपी घरात घुसला. घरात कोणी नाही याचा फायदा घेत तो बाथरुमपर्यंत पोहोचला. त्यानं मुलीवर अत्याचार केला. पीडितेची आरोळी ऐकून तिचा भाऊ धावत आता. तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.

पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सुदामा पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महिलांवरील अत्याचार वाढले...

राजधानीत महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस कंट्रोल रूममध्ये रविवारपासून 4 दिवसीय सेमीनार सुरू करण्यात आला आहे. यात पोलिसांना महिलांवर होणाऱ्या अत्याचाराशी संबंधित माहिती दिली जाणार आहे.

वाढदिवसाच्या बहाण्यानं महिलेवर गँगरेप...

दुसरीतडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही अशीच घटना समोर आली आहे. चार नराधमांना एका 44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. मानखुर्द येथे 24 जून रोजी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.

मानखुर्द पोलिसांनी चारही नराधमांना अटक केली आहे. मात्र, या घटनेने मानखुर्दसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत. मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी धारावीतील लेबर कॅम्प येथील रहिवासी आहेत.

आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याचा मित्र राज यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, असं खोटं सांगितलं होते. आरोपीनं पीडित महिलेला दुसरा आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतलं होतं. तिथं पीडित महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर अब्दुल शेख आणि रहीम शेख यांच्यासह चौघांनी महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. नंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडलं. गुंगी कमी झाल्यानंतर आपल्यावर अतिप्रसंग झाल्याचं पीडितेच्या लक्षात आलं.

हेही वाचा...संत तुकारामांचं देहू हादरलं, चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली पत्नीची हत्या

नंतर पीडित महिलेने 1 जुलै रोजी चारही आरोपीविरोधात तक्रार मानखुर्द पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चारही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

First published: July 5, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या