दिल्ली विमानतळावर बॅगेत RXD सापडल्याने खळबळ; राजधानीत अलर्ट!

दिल्ली विमानतळावर बॅगेत RXD सापडल्याने खळबळ; राजधानीत अलर्ट!

राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3वर एक संशयास्पद बॅग मिळाल्याने खळबळ उडाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3वर एक संशयास्पद बॅग मिळाल्याने खळबळ उडाली. सुरक्षा जवानांना तपासणीनंतर या बॅगेतून RDX सापडले आहेत. ही बॅक तातडीने सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर संपूर्ण विमानतळ आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील पोलिस स्थानकात शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास संशयास्पद बॅग सापडल्याचा फोन आला. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बॅग ताब्यात घेतली. बॅगेची तपासणी केली असता त्यांना त्यात RDX सापडले. RDX सापडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण विमानतळाची तपासणी सुरु केली आहे.

केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास टर्मिनल 3 वरील पिलर नंबर 4 च्या प्रवेशद्वारा जवळ एक संशयास्पद बॅग सापडली. ही बॅक सर्व प्रथम सीआयएसएफचे कॉस्टेबल व्ही.के.सिंग यांनी पाहिली. संबंधित बॅग ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. बॅगेच्या आत RDX सापडला आहे. त्यानंतर संपूर्ण विमानतळावर अलर्ट देण्यात आला. तसेच बॉम्ब विरोधी पथक देखील बोलवण्यात आले आणि विमानतळावरील प्रवासी आणि गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली होती.

देशातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विमानतळावर संशयास्पद बॅग सापडल्याने प्रवाशांमध्ये देखील खळबळ उडाली. या घटनेनंतर काही काळासाठी टर्मिनल 3 च्या समोरील रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच प्रवाशांना टर्मिनल 3च्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. पोलिस अद्याप या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 10:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading