हाफिज सईदला UN चा दणका, अतिरेक्यांच्या यादीतून नाव वगळण्यास नकार

हाफिज सईदला UN चा दणका, अतिरेक्यांच्या यादीतून नाव वगळण्यास नकार

हाफिज हा मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड समजला जातो.

  • Share this:

न्यूयॉर्क 7 मार्च  : लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्राने दणका दिला आहे. हाफीजचं त्याचं नाव अतिरेक्यांच्या यादीतून वगळण्यास संयुक्त राष्ट्राने नकार दिला आहे. या यादीतून नाव काढून टाकावं अशी मागणी करणारा अर्ज हाफिज सईदने केला होता.

बंदी असलेल्या जगभरातल्या दहशतवाद्यांची आणि संघटनांची यादी संयुक्त राष्ट्राने केली आहे. दरवर्षी ती यादी अपडेट होत असते. त्या यादीत नाव आल्यावर जगभर त्या संस्थांवर आणि व्यक्तिंवर आर्थिक निर्बंध येतात. त्यांच्या सर्व व्यवहारावरही बंदी येते. अशा व्यक्ती आणि संस्थांसोबत व्यवहार करण्यासही कुणी पुढे येत नाही त्यामुळे या यादीतून त्यांचं नाव वगळावं  अशी मागणी हाफिज सईदने केली होती.

तोयबावर बंदी घातल्यानंतर त्याने जमात उल दवा ही संघटना स्थापन केली होती. ही सामाजिक संस्था आहे असं सांगत त्यान त्या आडून दहशतवादी कारवाया केल्याचं उघड झालं होतं.

अमेरिकेने जाहीर केलं होतं बक्षीस

हाफिज हा मुंबईवरच्या  दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड समजला जातो. हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेनं एक मोठी घोषणा केली  होती. या हल्ल्याचे मास्टरमाईंड असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणाऱ्या व्यक्तीला 35 कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलं होतं.

'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ला केला. यामध्ये 166 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.

'26/11 च्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईद आणि झकी उर रहमान लख्वी यांना पकडण्यास मदत करणाऱ्याला 35 कोटींचं बक्षिस देण्यात येईल ,' अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी दिली होती.

First published: March 7, 2019, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading