मराठी बातम्या /बातम्या /देश /पापाचा घडा भरला! गँगस्टर अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा

पापाचा घडा भरला! गँगस्टर अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा

अतिक अहमदसोबतच त्याचा निकटवर्तीय शौकत हनीफ, दिनेश पासीसह आणखी एकाला जिल्हा न्यायालयाच्या एमपी एमएलए विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रयागराज, 28 मार्च : उमेश पाल अपहरण प्रकरणी अतिक अहमद दोषी आढळल्यानंतर त्याला न्यालायलायने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिक अहमदसोबतच त्याचा निकटवर्तीय शौकत हनीफ, दिनेश पासीसह आणखी एकाला जिल्हा न्यायालयाच्या एमपी एमएलए विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. तर अतिकचा भाऊ अशरफला निर्दोष ठरवण्यात आलं होतं.

अतिक अहमद याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केले होते.

मुस्लिमांसाठी रामकथेचं आयोजन, आमंत्रणाबाबत धीरेंद्र शास्त्रींनी केला खुलासा 

बसपा आमदार राजू पाल हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पालच्या हत्येनंतर यूपी पोलीस अतिक अहमदवर नजर ठेवून आहेत. उमेश पालचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी अतिक याला गुजरातमधील साबरमती कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आले होते. गेल्या 43 वर्षांत अतिकवर खून, लूट, दरोडा अशा गंभीर कलमांतून 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

First published:
top videos

    Tags: Uttar pradesh