उमा भारतींची निवडणूक न लढण्याची इच्छा

उमा भारतींची निवडणूक न लढण्याची इच्छा

केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना लोकसभा निवडणूक लढण्यची इच्छा नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांनी त्याबद्ल पत्र लिहून कळवलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांनी त्याबद्ल पत्र लिहून कळवलं आहे.

उमा भारती यांनी याआधी ट्विटर वर निवडणूक न लढवण्याबद्दल लिहिलं होतं. आता त्यांनी अधिकृतरित्या पत्र लिहून पक्षाला आपली भूमिका कळवली आहे. भाजपच्या संघटनात्मक कार्यात मला योगदान द्यायचं आहे, असं म्हणत आपला हा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे.

उमा भारती यांची 18 मे पासून तीर्थयात्रेला जायची योजना आहे.

मी निवडणूक लढणार नाही, हे मी 2016 मध्येच जाहीर केलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली.

मेरी झाँसी नही दूँगी

मी जर निवडणक लढले असते तर झाशीमधूनच लढले असते, असं सांगत मी माझा मतदारसंघ कधीच बदलू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. झाशीचे लोक मला मुलीसारखंच मानतात, असंही त्या म्हणाल्या.

उमा भारती या 2024 ची निवडणूक लढवण्याचाही विचार करत होत्या पण त्यांनी हा विचार बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप बहुमत मिळवेल, असा विश्वास मात्र त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने मला मुख्यमंत्रिपदापासून ते कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत सगळी पदं दिली आहेत, पक्षातलीही अनेक पदं मी सांभाळली याबद्दल मला समाधान आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

उमा भारती यांच्याकडे याआधी गंगा स्वच्छता खात्याची जबाबदारी देण्यात आली होती पण नंतर ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. असं असलं तरी गंगा नदीची स्वच्छता आणि राम मंदिर ही माझी दोन उद्धिष्टं आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.

===========================================================================================

VIDEO: उदयनराजे म्हणाले...'मी जे बोललोच नाही, ते दाखवले गेले'

First published: March 23, 2019, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading