Home /News /national /

युद्धाच्या संकटादरम्यान फुललं प्रेम! युक्रेनियन तरुणीने बांधली भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ, वाचा Love Story

युद्धाच्या संकटादरम्यान फुललं प्रेम! युक्रेनियन तरुणीने बांधली भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ, वाचा Love Story

आपला जीव वाचण्यासाठी ती फक्त दोन जोडी कपड्यांसह दिल्लीला आली. आता या मुलीनं आपल्या भारतीय प्रियकराशी (Indian Boyfriend) लग्न (Marriage) केलं आहे.

नवी दिल्ली 13 एप्रिल : रशियानं युक्रेनवर आक्रमण (Russia Ukraine War) केलेलं आहे. या आक्रमणाला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीदेखील दोन्हीपैकी एकही देश माघार घेण्यास तयार नाही. रशियन आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनमधील परिस्थिती भयंकर झाली आहे. युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर युक्रेनियन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. काही लोक अंडरग्राऊंड बॉम्ब शेल्टर्समध्ये (Underground Bomb Shelters) गेले तर काहींनी इतर युरोपियन देशांमध्ये आश्रय घेतला. पण यापैकी एक मुलगी अशी होती जिला संकटाच्या काळात भारताची (India) आठवण आली. आपला जीव वाचण्यासाठी ती फक्त दोन जोडी कपड्यांसह दिल्लीला आली. आता या मुलीनं आपल्या भारतीय प्रियकराशी (Indian Boyfriend) लग्न (Marriage) केलं आहे. Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला तीव्र; शहराच्या शहरं उद्ध्वस्त अॅना होरोदेत्स्का (Anna Horodetska) असं या युक्रेनियनं मुलीचं नाव आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बीबीसी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीव येथील रहिवासी असलेली 30 वर्षीय अॅना ऑगस्ट 2019 मध्ये भारतात आली होती. कीवमधील एका आयटी कंपनीत नोकरी करणारी अॅना सोलो ट्रीपसाठी (Solo Trip) भारतात आली होती. या भारतभेटीदरम्यान तिची अनुभव भसीन (Anubhav Bhasin) या तरुणाशी ओळख झाली होती. दिल्लीमध्ये राहणारा अनुभव वकील आहे. योगायोगानं दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी नंबरही एकमेकांना दिले होते. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अॅना युक्रेनला परतल्यानंतरही दोघे व्हिडिओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. 2020 मध्ये अॅना अनुभवला भेटण्यासाठी पुन्हा भारतात आली होती. यावेळी तिनं आपल्या एका मैत्रिणीलाही सोबत आणलं होतं. अनुभवनं दोघींनाही ताजमहाल दाखवला होता. प्रेमात पडलेल्या अनुभव आणि अॅनानं आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी लग्नाचं नियोजन सुरू केलं होतं. त्याचदरम्यान कोविड लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. रशियन सैन्याकडून बुचामध्ये 25 मुलींना कैदेत ठेवून बलात्कार, आता अनेकजणी प्रेग्नंट? लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना रशियानं युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर अॅनानं भारतात येण्याचा निर्णय घेतला. युक्रेनवरून भारतात येण्यासाठी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तोपर्यंत अनुभवने तिच्यासाठी इंडियन व्हिसाची (Indian Visa) व्यवस्था केली होती. 17 मार्च रोजी अॅना दिल्ली एअरपोर्टवर (Delhi Airport) आली. त्यावेळी अनुभवनं आपल्या मित्रांच्या मदतीनं मोठ्या जल्लोषात तिचं स्वागत केलं होतं. आता दोघांनी भारतीय पद्धतीनं लग्न केलं आहे. अनुभव भसीन हा प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नेहा भसीनचा (Neha Bhasin) भाऊ आहे. नेहानं स्वत: आपल्या भावाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत तिनं अॅनासाठी एक वेलकम नोटही लिहिली आहे. युद्धाच्या कठीणप्रसंगी दोन जोडी कपडे आणि आजीनं दिलेलं छोटी कॉफी मशीन घेऊन अॅनानं घर सोडलं होतं. तिचा लाडका कुत्रा कीवमध्येच राहिला आहे. त्यामुळे आपल्या कुत्र्याला आणण्यासाठी तिला एकदा युक्रेनला जाण्याची इच्छा आहे. सध्या ती युक्रेनमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट बघत आहे. सध्या बॉलिवुडसह सोशल मीडियावर अॅना आणि अनुभवच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
First published:

Tags: Love story, Russia Ukraine

पुढील बातम्या