News18 Lokmat

घोटाळेबाज नीरव मोदी आणखी अडकला; लंडन कोर्टाचा जामीन देण्यास नकार

पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या नीरव मोदीला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 03:43 PM IST

घोटाळेबाज नीरव मोदी आणखी अडकला; लंडन कोर्टाचा जामीन देण्यास नकार

लंडन, 26 एप्रिल : पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून ब्रिटनमध्ये राहत असलेल्या नीरव मोदीला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत आहे. पण शुक्रवारी झालेल्या सुनावणीत लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला. आता याच्या पुढची सुनावणी 24 मेला होईल.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अटक झाल्यानंतर नीरव मोदीची रवानगी लंडनच्या वँड्सवर्थ कारागृहात करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला 20 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच दिवशी कोर्टात हजर केले गेले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

VIDEO: हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, त्र्यंबकेश्वरमधील भीषण वास्तव

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...