नवा वादः चिंतामण गणेश स्टेशनचे नाव उर्दूत लिहिल्याने भडकले महंत, फलक हटवण्याची मागणी

नवा वादः चिंतामण गणेश स्टेशनचे नाव उर्दूत लिहिल्याने भडकले महंत, फलक हटवण्याची मागणी

Ujjain: महाकालेश्वर शंकरांचं दर्शन झाल्यावर बहुतांश भाविक 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतामण गणेश मंदिरात जाऊन गणपतीबाप्पाचं दर्शन घेतात. याच ठिकाणी रेल्वे स्टेशनवर लावलेल्या एका फलकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे

  • Share this:

उज्जैन, 04 मार्च: शहरांच्या नावावरुन वाद निर्माण होणे हे आपल्या देशासाठी काही नवीन आहे. आता मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधील एका नव्या रेल्वे स्टेशनच्या नामफलकावर लिहिलेल्या नावावरून वाद उफळला आहे. उज्जैन है हिंदू धर्माचं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. महाकालेश्वर शंकरांचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक इथं येत असतात. हे दर्शन झाल्यावर बहुतांश भाविक 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतामण गणेश मंदिरात जाऊन गणपतीबाप्पाचं दर्शन घेतात.

या गणेश मंदिरासमोर आता एक रेल्वे स्टेशन उभारण्यात आलं असून त्याला चिंतामण गणेश मंदिर स्टेशन असं नाव देण्यात आलं आहे. या स्टेशनचं उद्घाटन अजून झालेलं नाही त्याआधीच त्याच्याबद्दल वाद सुरू झाले आहेत. चिंतामण गणेश मंदिर स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने जो फलक लावला आहे त्यात हिंदी, इंग्रजीसोबतच उर्दू भाषेतही स्टेशनचं नाव लिहिलं आहे.

उज्जैनमधील आवाहन आखाड्याचे महंत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी या फलकावर उर्दूत नाव लिहिण्याला आक्षेप घेतला आहे. जिहादी वृत्तीच्या आणि मुघलांच्या भाषेचा स्वीकार आम्ही करणार नाही असं म्हणत शेखर यांनी या नामफलकाचा विरोध केला असून तो लवकरच बदलावा असं म्हटलंय. उर्दू ही अनैसर्गिक भाषा आहे त्यामुळे तिचा सार्वजनिक जीवनात वापर करू नये असंही त्यांचं मत आहे.

(हे वाचा-Explainer: संसदेच्या कामकाजाच्या LIVE प्रसारण कसं सुरू झालं? वाचा रंजक प्रवास)

नवं स्टेशन उभारलं

उज्जैनहून फातियाबादला जाणारी नॅरो गेज रेल्वे लाइन रेल्वे प्रशासनाने आधीच बंद केली होती. त्यानंतर त्याच मार्गावर ब्रॉड गेज लाइन टाकण्यात आली. याच मार्गावर असलेल्या चिंतामण गणेश मंदिरात भाविक जातात म्हणून त्या मंदिरासमोर रेल्वे स्टेशन उभारण्यात आलं आहे. उज्जैन फातियाबाद मार्गावरील हे पहिलं स्टेशन आहे. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण 6 किलोमीटरवर आहे. या नव्या स्टेशनच्या उद्घाटनापूर्वीच तिथं लावलेल्या नामफलकावरून हा वाद सुरू झाला आहे.

चर्चेत असतात संत शेखर

आवाहन आखाड्याचे संत महामंडलेश्वर आचार्य शेखर हे नेहमीच विविध विषयांबद्दल जाहीर भूमिका घेतात आणि चर्चेत असतात. मुस्लिम धर्मगुरू आणि काँग्रेस नेत्यांवर ते नेहमीच सडकून टीका करत असतात. त्यांनी हा नवा वाद सुरू केला आहे. त्यांना उर्दूला विरोध करत हा फलक बदलण्याचं आवाहन केलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 4, 2021, 10:27 AM IST

ताज्या बातम्या