कोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा

कोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा

देशातला हा बलात्काराचा पहिला असा खटला आहे ज्यात न्यायालयाने अवघ्या सहा तासात निर्णय दिलाय

  • Share this:

मध्यप्रदेश, 21 आॅगस्ट : बलात्काराच्या घटनेत नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये उज्जैनमध्ये सहा दिवसांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या प्रकरणा 14 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला अवघ्या सहा तासात न्यायाधिशांनी शिक्षा सुनावली आहे. देशातला हा बलात्काराचा पहिला असा खटला आहे ज्यात न्यायालयाने अवघ्या सहा तासात निर्णय दिलाय.

उज्जैनजवळील घट्टिया इथं 6 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला राजस्थान येथून अटक केली. आज या आरोपीला अल्पवयीन न्यायालयात आणण्यात आलं.

सोमवारी सकाळी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आणि जवळपास सहा तासात न्यायाधिशांनी आपला निर्णय दिला. देशातला हा बलात्काराचा पहिला असा खटला आहे ज्यात न्यायालयाने अवघ्या सहा तासात निर्णय दिलाय. बलात्कार करणाऱ्या 14 वर्षांचा अल्पवयीन आरोपीला दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

ही घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. उज्जैन जिल्ह्यातील घड्डिया इथं जलवा गावात राहणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलीवर 15 अॉगस्ट रोजी आरोपीने घरात बोलवून बलात्कार केला होता. या प्रकरणी घड्डिया पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात कलम 376 नुसार पाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपीने राजस्थानला पळ काढला. तिथे तो आपल्या नातेवाईकाकडे लपून बसला होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं.

सहा तासांत फैसला

पोलिसांनी पीडित मुलीचं आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. यात आरोपीनी अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सोमवारी सकाळी 11.15 वाजता पोलिसांनी मालनवास येथील ज्युवेनाईल कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी तत्काळ सुनावणी सुरू केली. साक्षीदार, पुरावे आणि वैद्यकीय अहवाल, डीएनए अहवालाच्या आधारावर अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आलां. संध्याकाळी 5.15 वाजता न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी आपला निर्णय दिला.

VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

First published: August 21, 2018, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading