'आधार'च व्हर्च्युअल आयडी, कितीही वेळा क्रमांक बदलू शकतात'

'आधार'च व्हर्च्युअल आयडी, कितीही वेळा क्रमांक बदलू शकतात'

  • Share this:

11 जानेवारी : आधार कार्डच्या सुरक्षेसाठी व्हर्च्युअल आयडी येणार आहे. आता आधार क्रमांकासाठी व्हर्च्युअल आयडीच असणार आहे असं UIDAI चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी स्पष्ट केलं.

आधार कार्डच्या सुरक्षेबाबत UIDAI चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी न्यूज18ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी, ज्या लोकांना आधार कार्डचा क्रमांक देत असताना अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यांनी यापुढे व्हर्च्युअल आयडी देऊ शकतात. ज्यामुळे त्यांचा आधार क्रमांक सुरक्षित राहणार आहे. व्हर्च्युअल आयडी हा कधीही बदला येतो अशी माहिती पांडे यांनी दिली.

आतापर्यंत देशात 119 कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहे. बँक, टेलिकाॅम, सार्वजनिक आणि इन्कम टॅक्स सारख्या विभागातही आधार कार्डचा वापर केला जातोय.

काय आहे व्हर्च्युअल आयडी ?

सध्या आधार हा 12 क्रमाकांचा आहे. आता व्हर्च्युअल आयडी हा 16 आकडी असणार आहे जो आधार कार्डच्या क्रमांकावरून तयार केला जाईल.

या आयडीमुळे कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक काढता येणार नाही

व्हर्च्युअल आयडी हा आधार कार्डच्या शेवटच्या क्रमाकांवरून तयार होईल

एका आधार कार्ड वरून एकच व्हर्च्युअल आयडी तयार होईल. तो ठराविक काळासाठी तयार होईल.

जेव्हा कधी पुन्हा आधारची गरज भासेल तेव्हा नव्याने व्हर्चुअल आयडी तयार करता येईल.

व्हर्चुअल आयडीमुळे आधारचा बनावट क्रमांक तयार करता येणार नाही.

 

First published: January 11, 2018, 11:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading