मराठी बातम्या /बातम्या /देश /ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, बायो-मेट्रिक लॉक आणि बरच काही, लवकरच मिळणार या सुविधा!

ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, बायो-मेट्रिक लॉक आणि बरच काही, लवकरच मिळणार या सुविधा!

देशातील नागरिकांना आधार क्रमांक (Aadhar Number) प्रदान करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI- यूआयडीएआय) लोकांना ऑफलाइन आधार पडताळणीसाठी (Offline Aadhar Verification) एक यंत्रणा सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

देशातील नागरिकांना आधार क्रमांक (Aadhar Number) प्रदान करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI- यूआयडीएआय) लोकांना ऑफलाइन आधार पडताळणीसाठी (Offline Aadhar Verification) एक यंत्रणा सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

देशातील नागरिकांना आधार क्रमांक (Aadhar Number) प्रदान करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI- यूआयडीएआय) लोकांना ऑफलाइन आधार पडताळणीसाठी (Offline Aadhar Verification) एक यंत्रणा सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 3 जू: देशातील नागरिकांना आधार क्रमांक (Aadhar Number) प्रदान करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI- यूआयडीएआय) लोकांना ऑफलाइन आधार पडताळणीसाठी (Offline Aadhar Verification) एक यंत्रणा सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये आधार क्रमांक कॅप्चर सर्व्हिस टोकन किंवा एएनसीएस टोकन नावाची प्रणाली वापरुन लोकांना त्यांचे बायोमेट्रिक्स लॉक करण्याची परवानगी देण्याची तरतूद आहे.

  यूआयडीएआयनं आधार प्रमाणीकरण (Aadhar Authentication) आणि ऑफलाइन पडताळणी संदर्भात मांडलेल्या या प्रस्तावात म्हटलं आहे की, आधार क्रमांक धारकाला त्याचे बायोमेट्रिक्स (Biometrics) कायमचे लॉक करण्यास किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी आवश्यक असल्यास तात्पुरते अनलॉक करण्याची सुविधा देता येईल. अशा कोणत्याही लॉक केलेल्या बायोमेट्रिक रेकॉर्डसच्या (Biometric Records) आधारे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास तो अयशस्वी ठरेल. आधारबाबत जारी करण्यात आलेल्या 2016 मधील नियमावली ऐवजी ही नवीन आधार 2021 नियमावली आणण्याचा विचार आहे.

  यूआयडीएआयने 20 मे रोजी सादर केलेल्या प्रस्तावात या तरतूदी मांडण्यात आल्या होत्या. बिझिनेस स्टँडर्डनं पहिल्यांदा याची माहिती दिली होती. या प्रस्तावामध्ये, आधार क्रमांक कॅप्चर सर्व्हिसचे (एएनसीएस) वर्णन आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांकासाठी तयार केलेला एनक्रिप्टेड आधार नंबर असं करण्यात आलं आहे. एएनसीएस टोकन हे यूआयडीएआयने निश्चित केलेल्या अल्प कालावधीसाठी वैध असेल. एएनसीएस ही नवीन यंत्रणा आहे की सध्याच्या यूआयडीएआय यंत्रणेची क्षमता विकसित करण्याचे काम करेल हे अजून कळू शकलं नाही.

  यूआयडीएआयने नमूद केलेल्या ऑफलाइन पद्धतींद्वारे आधार धारकाची ओळख पटवली जाण्याची ही यंत्रणा आहे. यूआयडीएआयने नमूद केलेल्या ऑफलाइन पडताळणीच्या पद्धतींमध्ये क्यूआर कोड, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी पडताळणी, ई-आधार पडताळणी आणि ऑफलाइन पेपर आधारित पडताळणी यासह इतर ऑफलाइन पद्धतींचा समावेश आहे. या पद्धती यूआयडीएआयकडून वेळोवेळी सादर केल्या जातील. सध्या, ऑफलाइन आधार डेटा पडताळणी सेवा पद्धतीत नागरिक अनेक टप्प्यांची प्रक्रिया पार करून डॉक्युमेंट निर्माण करतात.

  नवीन आधार नियमांमध्ये एक ऑफलाइन पडताळणी संस्था किंवा ओव्हीएसईचाही (OVSE) उल्लेख असून, ती यंत्रणा आधार कार्ड धारकासाठी ऑफलाइन पडताळणी करेल. ओव्हीएसई (OVSE)केवळ आधार धारकाचा ऑफलाइन आधार पडताळणीच्या वेळी आधारभूत माहिती मिळवण्यासाठी याचा वापरू शकेल. कोणतीही संस्था किंवा व्यक्ती दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्थेच्या वतीनं ऑफलाइन पडताळणी करू शकणार नाही, असंही या मसुद्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

  First published:

  Tags: Aadhar card