UGC चा राज्य सरकारला दणका, परीक्षा घेण्यास दिली परवानगी

UGC चा राज्य सरकारला दणका, परीक्षा घेण्यास दिली परवानगी

युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जुलै : कोरोना परिस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यावरुन वाद पेटला होता. परंतु, आता आता UGC ने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे.  सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास यूजीसीने मान्यता दिली आहे. UGC च्या निर्णयामुळे राज्य सरकाराला धक्का बसला आहे.

युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन (UGC)ने एक नियमावली  जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ऑफलाइन आणि ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा  होणार आहे.

लग्नापेक्षा काम महत्त्वाचं! सप्तपदी सोडून मंडपातच लॅपटॉपवर काम करायला लागली वधू

युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने राज्यात वाढत चालेली कोरोनाची परिस्थिती पाहता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता.

पुणे महापालिकेचे अधिकारीच गॅसवर, महापौरांना कोरोना झाल्यामुळे खळबळ

यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. एवढंच नाहीतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राज्य सरकारच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांनी याबद्दल परीक्षा घेण्याबद्दल पत्रही लिहिले होते. त्यानंतर शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांशी चर्चा करून निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.   त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 8:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या