UGC NET Result June Result 2019: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल, वाचा ताजे Update!

UGC NET Result June Result 2019: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल, वाचा ताजे Update!

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट National Eligibility Test (UGC NET 2019)परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जुलै: नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट National Eligibility Test (UGC NET 2019)परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाईट ntanet.nic.inवर जाऊन निकाल पाहू शकतात. महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा 6 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. अधिकृत वेबसाईटने निकालासंदर्भात अद्याप नोटिफिकेशन जारी करण्यात आले नाही. पण आज निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

UGC NET परीक्षा यंदा 20 जून ते 26 जून दरम्यान घेण्यात आली होती. यावेळी 6 लाख 81 हजार 718 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा सकाळी 9.30 ते 12.30 तर दुसरा टप्प्यात 2.30 ते 5.30 अशा वेळेत घेण्यात आली होती. ही परीक्षा 91 शहरांमधून घेण्यात आली होती. NET June 2019चा निकाल ऑनलाईन प्रसिद्ध होणार आहे.

असा चेक करा निकाल-

1) अधिकृत वेबसाईट ntanet.nic.inला भेट द्या

2) वेबसाईटवर UGC NET June 2019 Result या लिंकवर क्लिक करा

3) ओपन झालेल्या विंडोत तुमचा क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा

4) सबमिट म्हणताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

5) तुम्ही तुमच्या निकालाची प्रिंट देखील काढू शकता

VIDEO: 98 तास माकडाचा जीवाशी संघर्ष; अधिकाऱ्यांनी लावली जीवाची बाजी

First published: July 13, 2019, 11:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading