Home /News /national /

UGC NET 2020: युजीसी-नेट परीक्षा लांबणीवर, जाणून घ्या नवं वेळापत्रक

UGC NET 2020: युजीसी-नेट परीक्षा लांबणीवर, जाणून घ्या नवं वेळापत्रक

इतरही परीक्षा त्याच तारखांदरम्यान होणार असल्याने NETची परीक्षा लांबणीवर पडली आहे.

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर: नॅशनल टेस्टिंग एजेंसी, एनटीएने (National Testing Agency, NTA)  युजीसी नेट परीक्षा 2020 (UGC NET Exam 2020) लांबणीवर टाकली आहे. आता या परीक्षा 24 सप्टेंबरपासून सुरू होतील. आधीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा 16 सप्टेंबरपासून होणार होत्या. त्या आता आठवडाभर लांबणीवर गेल्या आहेत. प्रवेशपत्र आणि इतर गोष्टींबाबत माहिती ugc.nta.nic.in  या वेबसाईटवर दिली जाणार आहे. इतरही परीक्षा त्याच तारखांदरम्यान होणार असल्याने NETची परीक्षा लांबणीवर पडली आहे. 16, 17, 22 आणि 23 सप्टेंबर 2020ला इतर परीक्षा होणार आहे. 'नेट परीक्षांच्या तारखा या AIEEA-UG/PG आणि AICE-JRF/SRF (Ph.D.) 2020-21 या परीक्षांसोबत येत असल्याने तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसी नेट परीक्षा ही कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी होत असते. वर्षातून दोन वेळा या परीक्षा होत असतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व परीक्षांचं वेळापत्रकच कोलमडलं आहे. त्यामुळे तारखांचा घोळ सुरू आहे. NEET आणि JEE परीक्षांबाबतही देशभर प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. त्यानंतर हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत केलं. मात्र सुप्रीम कोर्टाने या परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. कोरोनामुळे आयुष्य थांबून राहू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं होतं. परीक्षा घेतांना सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या असे निर्देशही कोर्टाने दिले होते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या