News18 Lokmat

कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर कारवाई : युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ-उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकांचं रण तापत असताना मध्य प्रदेशात आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 06:38 AM IST

कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर कारवाई : युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ-उद्धव ठाकरे

मुंबई, 9 एप्रिल : लोकसभा निवडणुकांचं रण तापत असताना मध्य प्रदेशात आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर सुरू असलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. ''कोणावर धाडी घालायच्या व घालायच्या नाहीत हे शेवटी सत्ताधारी ठरवत असतात. आज जे विरोधात आहे त्यांच्या सत्ताकाळातही यापेक्षा वेगळे घडत नव्हते. युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात. आपल्या देशात लोकशाही फक्त नावाचीच असते. ज्यांच्या हाती ससा तोच पारधी हा आमच्या लोकशाहीचा खरा चेहरा आहे'', अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय ?

- परदेशातील काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात आणू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला दिले होते. त्यातला किती पैसा परत आला ते कुणीच सांगू शकत नाही, पण काळा पैसा परदेशात नसून तो आपल्याच देशात आहे व आपल्या निवडणुका हीच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची गंगोत्री आहे. या गटारगंगेत सगळेच डुबक्या मारीत आहेत.

- निवडणुकांच्या धामधुमीत ‘आयकर’ विभागाने सर्जिकल स्ट्राइक केले आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, गोवा अशा ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. जेथे धाडी टाकल्या त्या सर्व व्यक्ती व ठिकाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित आहेत. कमलनाथ यांचे नातेवाईक, काही अधिकारी यांच्यावर पडलेल्या धाडीत पाच-पंचवीस कोटी रुपयांची रोकड सापडली व पैशांची मोजदाद संपत नाही, असे चित्र दिसत आहे.

- बहुधा निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत ही मोजदाद व त्याबाबतच्या बातम्या सुरूच राहतील असे दिसते. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक घोषवाक्य बनवले आहे ते म्हणजे ‘अब होगा न्याय!’ काँग्रेससंबंधित मंडळींवर धाडी पडल्यावर मात्र ‘अब हो रहा है अन्याय’ अशी ओरड सुरू झाली आहे.

Loading...

- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांच्या खात्यात 72 हजार रुपये जमा करण्याची योजना जाहीर केली आहे. योजना चांगली आहे, पण त्यासाठी पैसा कोठून आणणार? असे विचारले तेव्हा त्यांनी अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या मंडळींनी देश कसा लुटला व नरेंद्र मोदींमुळे या मंडळींना हजारो कोटींचा लाभ कसा झाला ते सांगितले. हा काळा पैसा रोखू असे त्यांनी सांगितले.

- कमलनाथ यांच्या जवळच्या व्यक्तींकडे सापडलेले ‘घबाड’ याबाबतही त्यांना आता बोलावे लागेल. मध्य प्रदेशात पडलेल्या धाडी सहज पडलेल्या नाहीत. त्यामागे राजकीय सुसूत्रता

वाचा अन्य बातम्या

VIDEO : पार्थसाठी राज ठाकरे घेणार सभा? अजित पवार म्हणतात...

SPECIAL REPORT : अनिल गोटेंचं बंड, भामरेंविरोधात थोपडले दंड!

VIDEO : विखे पाटील भाजपात जाणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...

- ईडी’, ‘आयकर’ ही खाती निवडणूक काळातच नव्हे तर इतर वेळीही सरकारचे राजकीय हत्यार म्हणूनच वापरली जातात. आजवरच्या सर्वच सरकारांमध्ये हे चित्र दिसले आहे. त्यामुळे त्याविरोधात ओरडण्याचा नैतिक अधिकार तसा कोणत्याही पक्षाला नाही. निवडणुकांत फक्त राजकीय पक्ष उतरत नाहीत, तर ‘आयकर’, ‘ईडी’देखील उतरवले जातात व खेळात थरार निर्माण केला जातो.

- निवडणूक हे युद्ध आहे व एकमेकांच्या तंबूच्या कनाती कापण्याचे प्रकार शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू राहतील. निवडणुका पैशांवर लढवल्या जातात. त्यामुळे कोणाकडे किती व कोठून पैसा येतोय यावर एकमेकांच्या गुप्त नजरा आहेत. पैसा पकडला की समोरचा उमेदवार पांगळा पडतो हे त्यामागचे सूत्र असते. सत्तेवरचा प्रत्येक पक्ष हेच सूत्र पकडत असतो.

-काँग्रेससाठी मध्य प्रदेश आणि कमलनाथ हेच निवडणुकीचे मुख्य स्रोत असावेत. तेथेच ‘बूच’ लावून काँग्रेसला हतबल करण्याचा हा खेळ आहे

- युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात. सत्ता टिकविण्यासाठी हव्या त्या मार्गाचा अवलंब करा, हा आपल्या लोकशाहीचा मंत्र झाल्याने सगळय़ांचेच ताळतंत्र सुटले आहे. सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर होत आहे व विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी धाडी पडत असल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. खरे तर हा आरोप ममता बॅनर्जी यांनी करावा हे आश्चर्यकारकच आहे.

- विरोधकांवरील धाडी ही नित्याची बाब आहे. ऊर बडवून काय होणार? काल जात्यात होते ते आज सुपात आहेत आणि सुपातले जात्यात आहेत. निवडणूक आयोग आता काय करणार?

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 06:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...