Elec-widget

पंतप्रधान मोदींच्या राम मंदिरावरील 'त्या' विधानावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

पंतप्रधान मोदींच्या राम मंदिरावरील 'त्या' विधानावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

राम मंदिरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावलेल्या टोल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पलटवार केला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील सभेमध्ये राम मंदिर प्रश्नावरून अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालय दोन्ही बाजूनंचे म्हणणं ऐकत आहे. पण गेले काही दिवस वाचाळवीर उलटसुलट वक्तव्यं करून यामध्ये अडथळा निर्माण करत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शिवसेनेला टोला लगावला. पंतप्रधानांच्या या टोल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पलटवार केला आहे. ते म्हणाले आहेत की, 'राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर या विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपातच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे. बडबोलेपणामुळे पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर भाजप नेत्यांनी राममंदिरावर बोलणे टाळले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांची सूचना मान्य करून तोंडास कुलुपे घातली तर राममंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा! पंतप्रधानांचीच तशी इच्छा आहे!', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- कायदेशीर मार्गाने अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी असे पंतप्रधानांना वाटत आहे.

- राममंदिराचा प्रश्न न्यायालयात असताना काही ‘बडबोले’ आणि ‘बयान बहाद्दर’ निरर्थक चर्चा घडवून आणत आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली व ती योग्यच आहे. आता हे बडबोले कोण? यावर ‘बयानबाजी’ सुरू झाली आहे.

- मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांना सगळय़ात जास्त त्रास स्वपक्षातील बडबोल्यांपासूनच होत आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱयांनी तोंडास कुलूप लावावे असे मागे पंतप्रधानांना हात जोडून सांगावे लागले.

Loading...

(वाचा : आदित्य ठाकरे, फडणवीसांविरोधात काँग्रेसची रणनीती, प्रियांकाही उतरणार मैदानात?)

- भाजप खासदार सिन्हा यांचे म्हणणे असे की, सुप्रीम कोर्टात बसलेल्या काही मंडळींनाच अयोध्येत राममंदिर झालेले नको आहे. हे वक्तव्य म्हणजे सरळ सरळ सुप्रीम कोर्टावरचा अविश्वासच होता व पंतप्रधान म्हणून मोदी यांना हे सर्व न पटणारे असावे.

- भाजपच्या मुकुट बिहारींचे म्हणणे असे की, ‘‘अयोध्येत राममंदिर होणार म्हणजे होणारच. कारण सुप्रीम कोर्ट आमचे आहे! देशाची न्यायव्यवस्था भाजपच्या मुठीत असल्याने राममंदिराचा निर्णय अनुकूलच लागेल.’’ या बडबोलेपणाने सुप्रीम कोर्टही हादरले.

(वाचा :'मसाज' करण्यासाठी मुलींना खोलीत बोलावलं, चिन्मयानंदने दिली गुन्ह्याची कबुली)

- मुख्य न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली व पंतप्रधान मोदींच्या ‘न्यायप्रिय’ भूमिकेवर विरोधक शंका उपस्थित करू लागले.

- राममंदिरावर संबित पात्रा या आणखी एका भाजप नेत्याने परवाच मोठे वक्तव्य करून मोदी यांच्या अडचणी वाढवल्या आहेत- ‘‘अयोध्येत राममंदिर कार्य लवकरच सुरू होईल व ‘भगव्या पार्टी’चा तो मुख्य अजेंडा आहे.’’ हे सर्व ऐकल्यावर पंतप्रधान मोदी या मंडळींना कोपरापासून नमस्कारच करीत असावेत.

- कश्मीरमधून 370 कलम जसे धडाक्यात हटवले त्याच हिमतीने अयोध्येतही भव्य राममंदिर उभारले जाईल, असा विश्वास देशातील जनतेला वाटत असेल तर त्यांना दोष का द्यावा?

(वाचा : पंतप्रधान मोदींचे आरोप खरे निघाले तर राजकारण सोडू, राष्ट्रवादीचा पलटवार)

अमोल कोल्हेंनी मोदींची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंना लगावला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 07:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...